शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही होत होता सैराट ; बहिणीच्या पतीवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:10 IST

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार करुन त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न बुधवारी सायंकाळी चांदणी चौकात झाला होता़.

ठळक मुद्देसुदैवाने तो थोडक्यात बचावला व पुण्यात सैराटची आवृत्ती होता होता बचावली़. 

पुणे : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार करुन त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न बुधवारी सायंकाळी चांदणी चौकात झाला होता़. मात्र, सुदैवाने तो थोडक्यात बचावला व पुण्यात सैराटची आवृत्ती होता होता बचावली़. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने तिघांना अटक केली आहे़. आकाश लहू तावरे (वय २२),सागर लहू तावरे (वय २४) व सागर रामचंद्र पालवे (वय २१ रा. तिघेही राजे,ता. भोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या गोळीबारात तुषार प्रकाश पिसाळ (वय ३०, रा़ राजेगाव, भोर) हे जखमी झाले आहेत़. पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार पिसाळ याने आरोपी आकाश व सागर यांची बहिण विद्या हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता.  या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. यापूर्वीही त्यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यातून तुषार पिसाळ याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. याच रागातून तिघांनी ८ मे रोजी चांदणी चौकातील पेट्रोल पंपासमोर मित्रासमवेत तुषार पिसाळ हे दुचाकीवरून जात होते़ त्यावेळी चौघांनी येऊन राजू तावरे याने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या़. तिघांनी तू मरायलाच पाहिजे असे म्हणून शिवीगाळ केली होती़. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तुषार पिसाळ यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस हवालदार सुनिल पवार यांना माहिती मिळाली की, या  गुन्ह्यातील आरोपी हे जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात थांबले आहेत. त्यानुसार सापळा लावण्यात आला़. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चारही बाजूने घेरून त्यांना अटक केली.ही कामगिरी, गुन्हे शाखा उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, विजय झंजाड, सुनिल पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, शंकर पाटील, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस