शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने चौकशीच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 07:07 IST

Rekha Jare murder case: जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे. घटनेनंतर पोलीस माने यांच्या घरी गेले तेव्हा त्या घरी नव्हत्या. त्यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे त्यांचाही शोध सुरू केल्याचे पोलीस  सूत्रांनी सांगितले.जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी स्वत: कार चालवून जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे. बोठे हत्याकांडाचा सूत्रधार निघाल्याने माने यांनी बोठे याच्याशी केलेला संपर्कही संशयाच्या फेऱ्यात आला आहे. सागर भिंगारदिवेच्या घराची झडतीजरे यांच्या हत्याकांडात बाळ बोठे याचा साथीदार असलेल्या सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची शनिवारी पोलिसांनी झडती घेतली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले.जरे यांची बोठेविरोधात तक्रारमयत रेखा जरे यांनी २२ डिसेंबर २०१८ रोजी नगर शहरातील कोतवाली पोलिसांना निवेदन देऊन बाळ बोठे याच्या विरोधात तक्रार केली होती. बोठे याने त्याच्या मोबाईलवरून जरे यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. हा संदेश आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच पाठविला असल्याचे जरे यांनी निवेदनात म्हटले होते.बोठेचा शोध लागेनाहत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे शहरातून फरार झाला. पोलिसांची पाच पथके त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याच्या मित्रांवरही लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर