शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी संबंधांना नकार, धारधार शस्त्रानं तिघांनी केला तरुणावर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 17:49 IST

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघे समलैंगिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून त्यांनी जखमीकडे सेक्सची मागणी केली होती.

पुणे : समलैंगिक संबंधांना नकार देणार्‍या 24 वर्षाच्या तरुणावर तिघांनी मिळून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. पुण्यातील टिळक रस्त्यावरील गिरीजा हॉटेलजवळ रविवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर, परिसरातील नागरिकांनी युवकावर खुनी हल्‍ला करणार्‍या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघे समलैंगिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून त्यांनी जखमीकडे सेक्सची मागणी केली होती. त्यास जखमी युवकाने स्पष्ट नकार दिल्याने त्यांनी हा खुनी हल्‍ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसानी येरवडा येथे राहणाऱ्या 18 वर्षाच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. दुपारी अडीच वाजण्यापूर्वी आरोपी आणि जखमी हे एका इमारतीच्या खाली गेले होते. तेथे आरोपींनी दिनेशकडे सेक्सची मागणी केली. दिनेशने त्यांना स्पष्ट नकार दिल्याने तिघांनी त्यांच्याजवळ असलेल्या घातक हत्याराने त्याच्यावर खोलवर वार केले. जखमी दिनेशने मोठ-मोठयाने आरडा ओरड सुरू केली. परिसरातील नागरिकांनी इमारतीच्या आजु-बाजुला गर्दी केली. काही युवकांनीही घटनास्थळार धाव घेतली. त्यावेळी त्यांना रक्‍ताच्या थारोळयात पडलेला दिनेश दिसला. नागरिकांनी त्याला तेथुन बाहेर काढले आणि तात्काळ रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. तसेच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

याबाबत माहिती मिळताच, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमी दिनेशला रूग्णालयात पाठविले. सध्या गंभीर जखमी झालेल्या दिनेशवर शस्त्रक्रिया चालू असल्याची माहिती देण्यात आली असून त्याची प्रकृती सद्यातरी स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी हे येरवडा परिसरातील आहेत. आरोपी आणि जखमी झालेला दिनेश हे टिळक रस्त्यावर कशासाठी आले होते, याची माहिती घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेsexual harassmentलैंगिक छळ