शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंड रिक्वेस्ट नाकारल्याने, महिला अन् मुलींना पाठवले अश्लिल फाेटाे, मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 15:46 IST

Cyber Crime : याप्रकरणी अज्ञाताविराेधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायगड - इंस्टाग्रामवर फ्रेंड्स ग्रुप तयार करुन, त्यावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून अल्पवयीन मुलींसह महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार मुरुडमध्ये घडला आहे. याप्रकरणी अज्ञाताविराेधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने इंन्स्टाग्राम या सोशल नेटर्किंगचा वापर करुन बोगस इंन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यानंतर आराेपीने संबंधीत फिर्यादी महिलेसह अन्य मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.अनाेळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याने फिर्यादी महिलेनेही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली नाही. त्याचप्रमाणे अन्य काही मुलींनीही ती स्विकारली नाही आणि सदरचे अकाऊंट ब्लाॅक केले. त्यामुळे सदर आराेपीने फ्रेंड्स इंन्स्टाग्राम ग्रुप तयार करुन त्यामध्ये फिर्यादीसह अन्य मुलींना त्यांच्या संमतीशिवाय ग्रुपमध्येअॅड केले. सदर ग्रुपवर अश्लिल मेसेज आणि छायाचित्रे त्याने पाठवली. आराेपीने फिर्यादी महिलेसह अन्य पीडित मुलींचा विनयभंग केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, फिर्यादी महिलेने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात विनयभंग, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. सोशल मिडीयाचा वापर करताना सर्वांनीच अधिक सजग राहण्याचे तसेच अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संर्पक साधण्याचे आवाहन सायबर सेल विभागाने केले आहे. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRaigadरायगडcyber crimeसायबर क्राइम