शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! अभ्यास करत नाही म्हणून आत्याने चिमुकल्या भाचीची नखे पकडीने उपटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:44 IST

बंगळुरू - सात वर्षांची भाची अभ्यास करत नाही म्हणून तिच्या आत्याने पकडीने चिमुकल्या भाचीची नखेच उपटली आहेत. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी भाचीला मारहाण करणाऱ्या आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. तसेच बाल अत्याचार कायद्यांतर्गत (पॉक्सो ) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.चिमुकलीच्या हाताला झालेली जखम पाहून ...

बंगळुरू - सात वर्षांची भाची अभ्यास करत नाही म्हणून तिच्या आत्याने पकडीने चिमुकल्या भाचीची नखेच उपटली आहेत. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी भाचीला मारहाण करणाऱ्या आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. तसेच बाल अत्याचार कायद्यांतर्गत (पॉक्सो ) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

चिमुकलीच्या हाताला झालेली जखम पाहून तिच्या आजीने तिला रुग्णालयात दाखल केले. तिला अभ्यासासाठी पेन्सिलही हातात धरता येत नव्हती. तसेच तिला हातही हलवता येत नव्हता. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीला विचारले असता अभ्यास करण्यासाठी आत्या नेहमी मुलीला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले. तसेच अभ्यास करत असूनही तिने पकडीने माझे बोट दाबले आणि त्यानंतर तिने माझे नख उपटल्याचे मुलीने सांगितले. या घटनेबाबत डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पॉक्सो अन्वयेगुन्हा दाखल करून आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. ते मुलीवर अत्याचार का करत होते याची पोलीस चौकशी करत आहेत. चिमुकल्या मुलीच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. तर वडील कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात राहत असल्याने ही मुलगी आत्याकडे राहात होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा