शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

हनीमूनऐवजी पोहोचला हॉस्पिटलला! आधी अवैध संबंध मग लिव्ह इन पार्टनरशिप, पाठलाग सोडवण्यासाठी रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:47 IST

Reached the hospital instead of honeymoon :नवसारीतील मिंडाबारी येथे राहणारा 28 वर्षीय लतेश नवरा म्हणून सासरच्या घरी पोहोचला. त्याने सात फेरे घेतले होते आणि आता तो नवीन आयुष्याला सुरुवात करत होता.

लग्नसमारंभात भेटवस्तू देण्याची प्रथा फार जुनी आहे. पण गुजरातमध्ये एका व्यक्तीने लग्नादरम्यान असे गिफ्ट दिले की, गिफ्ट उघडणारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तर गिफ्ट देणाऱ्यालाही तुरुंगात जावे लागले. आता प्रश्न असा आहे की, शेवटी त्या भेटीवस्तूत काय होते? आणि भेटवस्तू पाठवणाऱ्याने अशी भेट का पाठवली? या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी एक प्रेमकथा होती. अशी प्रेमकहाणी ज्यात प्रेमाचा कालांतराने शेवट झाला, मग मागे राहिली फक्त प्रेमकथा.गुरुवार, 12 मेनवसारीतील मिंडाबारी येथे राहणारा 28 वर्षीय लतेश नवरा म्हणून सासरच्या घरी पोहोचला. त्याने सात फेरे घेतले होते आणि आता तो नवीन आयुष्याला सुरुवात करत होता.मंगळवार, 17 मे

लग्नाच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 17 मे मंगळवारला जेव्हा लतेश नवरीसोबत घरी परतला आणि हनिमूनला जाण्याऐवजी थेट हॉस्पिटलमध्ये गेला. तेही इतक्या गंभीर अवस्थेत की त्याच्याकडे बघणं देखील कठीण झालं. केवळ लतेशच नाही तर त्याचा तीन वर्षांचा भाचाही इतका गंभीर जखमी झाला आहे की, त्याचे संपूर्ण कुटुंब आता अडचणीत आले आहे. सध्या भाचाही लतेशसोबत हॉस्पिटलच्या बेडवर जीवन-मरणाच्या दारावर आहे. पण मग प्रश्न असा आहे की, नववर बनलेल्या लतेश आणि त्याच्या निष्पाप भाच्याची अशी गंभीर अवस्था झाली. त्यांच्यावर कोणी जीवघेणा हल्ला तर केला नाही ना?जर उत्तर होय असेल तर, का? आणि कोण? लतेशचे कोणाशी जुने वैर होते का? नवविवाहित वधूच्या आयुष्यातील रहस्य काय आहे की ती इतकी वाईटरित्या जखमी झाली आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली? चला तर मग या कथेचे सत्य जाणून घेण्यासाठी थोडे मागे जाऊ या.गुरुवार, 12 मे - गाव गंगपूर, नवसारीत्यादिवशी लग्नवरात हरिश्चंदरच्या घरी आली होती. त्यांची धाकटी मुलगी सलमा हिचा विवाह जवळच्या मिंडाबारी गावात राहणारा भयकू भाई गावित यांचा मुलगा लतेश याच्याशी होणार होता. सगळ्यांना खूप आनंद झाला. लग्न झाले आणि हरिश्चंदरने आनंदाने आपली मुलगी सलमा आणि त्याचा नवीन जावई लतेश यांना निरोप दिला आणि सासरी सोडले. लग्नानंतर लतेशही खूप आनंदी होता. यानंतर बरोबर पाच दिवसांनी एक विचित्र घटना घडली. घरात बसून लतेश लग्नात मिळालेल्या भेटवस्तू उघडत होता. इतक्यात त्याची नजर एका सुंदर बॉक्समध्ये पॅक केलेल्या इलेक्ट्रॉनिक टेडी बिअरवर पडली. टेडी बिअर खूपच गोड होता.असा झाला स्फोटलतेशचा तीन वर्षांचा भाचा जियानही जवळच उभा होता. अशा परिस्थितीत लतेशने टेडी-बिअर चालू करून आपल्या भाच्याला देण्याचे ठरवले आणि त्याच उद्देशाने त्याने टेडी बिअरची केबल प्लगमध्ये टाकली आणि ती चालू केली. त्यावेळी मोठा आवाज झाला. इतकेच नाही तर संपूर्ण गाव हादरले. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की, तो दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.दुसरीकडे या जोरात झालेल्या स्फोटात लतेश आणि त्याचा निष्पाप भाचा गंभीर जखमी झाला. लतेशच्या संपूर्ण शरीर रक्ताळलेले होते. या स्फोटात डाव्या हाताचे मनगट पूर्णपणे उडाले, तर दोन्ही डोळ्यांनाही इजा झाली. चिमूल्य भाच्यालाही गंभीर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर स्फोटाच्या ठिकाणी म्हणजे लतेशच्या घरातील सर्व वस्तू विखुरल्या होत्या. रक्तरंजित कटसाहजिकच, केवळ इलेक्ट्रॉनिक टेडी बिअरचा एवढा मोठा स्फोट होऊ शकला नसता की त्यामुळे कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकतो, संपूर्ण घराचा चक्काचूर होऊ शकतो आणि स्फोटाचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येऊ शकतो. अर्थात, हे फक्त गनपावडरने शक्य होते. आणि जर ते स्फोटक असते तर तो निश्चितच कट होता आणि जर तो कट होता, तर कोणाचा प्रश्न आहे?पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केलाप्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची बातमी नवसारी पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307 अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि स्फोटक कायदा कलम 114 अन्वये स्फोटके पेरल्याच्या गुन्ह्यासाठी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. लतेशच्या सासरच्या म्हणजेच त्याची वधू सलमा हिच्या घरून ही चौकशी करण्यात आली. हे जाणून घ्यायचे होते की, हे स्फोटक असलेलं टेडी-बिअर नवविवाहित जोडप्याला म्हणजेच लतेश आणि सलमाच्या हाती कोणी दिले आणि का?जेव्हा तपास पुढे सरकला तेव्हा पोलिसांना आरती बेन या आशा वर्करची माहिती मिळाली, जी या टेडी-बिअरसह लग्नाच्या दिवशी सलमाच्या घरी पोहोचली होती आणि सलमाची मोठी बहीण जागृती बेन यांच्याकडे हा टेडी-बिअर सुपूर्द केला. जागृती बहिणीला आणि तिच्या पतीला ती भेटवस्तू सुपूर्द करते. जेव्हा वराने आपल्या भाच्यासोबत पाच दिवसांनी हे टेडी-बिअर उघडले तेव्हा एक स्फोट झाला.आशा वर्करचा टेडी बेअरवधू सलमा किंवा तिच्या कुटुंबीयांचे आशा वर्कर आरती बेनशी किंवा वर लतेश किंवा त्याच्या कुटुंबीयांशी कोणतेही वैर नव्हते. अशा स्थितीत ती गनपावडरसह टेडी-बिअर घेऊन लग्नघरात का पोहोचली, असा प्रश्न उपस्थित होत होता. तिने हे टेडी-बिअर स्वतः आणले होते की कोणीतरी तिच्या हाती हे टेडी-बिअर पाठवले होते? त्यामुळे पोलिसांच्या तपासात प्रगती होत असताना असा चेहरा समोर आला, जो पाहून सगळेच हैराण झाले. हा चेहरा होता राजेश पटेल याचा.राजेश पटेल हा मास्टरमाईंड निघालाहोय, तो राजेश पटेल, जो एकेकाळी वधू सलमाची मोठी बहीण जागृती बेनचा प्रियकर आणि लिव्ह-इन पार्टनर होता. त्यामुळे राजेश आणि जागृती बेन यांना सहा वर्षांची मुलगी आहे. पण राजेशने हा कट का रचला, हा प्रश्न आहे. त्याने सलमा आणि जागृतीच्या घरी हे टेडी-बिअर पाठवून सलमा आणि जागृतीला मारण्याचा प्रयत्न का केला? त्यामुळे पोलिसांनी राजेशला पकडून त्याची चौकशी केली असता वेगळीच गोष्ट समोर आली.

राजेश पटेल याचे वधू सलमाची मोठी बहीण जागृती हिच्याशी २००९ पासून प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. दोघेही अनेक वर्षे एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते आणि यादरम्यान त्यांना एक मुलगीही झाली, तिचे वय सध्या ६ वर्षे आहे आणि राजेशचे आधीच लग्न झालेले असताना आणि तिला एक सात वर्षांची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा देखील आहे. पण वास्तव हे आहे की, आता राजेश विवाहित असूनही त्याचे प्रेमप्रकरण पुढे जाऊ शकले नाही आणि त्याला जागृती बेनकडून सुटका मिळवायची होती. लिव्हइन पार्टनरसाठी कट रचला गेलापण सत्य हे होते की, जागृती त्याला इतक्या सहजासहजी सोडायला तयार नव्हती. विशेषत: जेव्हा त्या दोघांनाही एक मुलगी होती. अशा परिस्थितीत स्वतःच्या मुलीचा आणि लिव्ह इन पार्टनर जागृतीचा जीव घेण्याचा हा सगळा कट राजेशने रचला. आपल्या माहितीतील आशा वर्कर आरती बेनला हाताशी घेऊन त्याने हा कट रचला. तिला गनपावडरसह टेडी-बिअर दिला आणि जागृतीच्या मुलीला विशेषतः त्याच्या स्वत: च्या मुलीकडे सोपवण्यास सांगितले. पण चुकून आरती बेनने जागृतीच्या मुलीऐवजी जागृतीच्या हातात टेडी-बिअर दिला आणि परत आली.दुसरीकडे, सलमाच्या लग्नानंतर, जागृतीने ते नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू समजून सलमा आणि तिच्या पतीला दिले, त्यांच्यासोबत लतेशने मिंडाबारी येथे आपल्या घरी पोहोचले आणि भेटवस्तू उघडताच त्याचा स्फोट झाला. म्हणजेच कुणाला दुसऱ्याला मारायचे होते. पण नववर आणि भाचा स्फोटात जखमी झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसmarriageलग्नBlastस्फोट