शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

मुलीच्या भविष्यासाठी गाठली मुंबई...अन् अडकली दलालांच्या सौदेबाजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:50 IST

पोलिसांमुळे तरुणीची नरकयातनेतून सुटका; बालवयातच सोसल्या यातना

मनीषा म्हात्रेमुंबई : लहानपणीच आई-वडील विभक्त झाले. आधार ठरलेल्या आजीने कोवळ्या वयातच हात पिवळे करून  जबाबदारी पार पाडली. वयाच्या १६ व्या वर्षी मातृत्व तिच्या पदरात पडले. मुलीच्या जन्मानंतर पतीनेही साथ सोडली. आपल्या नशिबी आलेले भोग पोटच्या मुलीच्या नशिबी येऊ नयेत म्हणून नोकरीच्या शोधात तिने कोलकाता गाठले. मात्र, तेथे वेश्याव्यवसायात अडकली. तेथून सुटका होऊन नोकरीच्या आशेने, मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने मुंबई गाठली आणि येथेही मायानगरी मुंबईच्या रेड लाइट खोलीत ती बंद झाली. बांगलादेशी म्हणून अटकेची भीती घालत डांबून ठेवत दलालांनी तिच्या शरीराचे रोज सौदे केले. अखेर, तिची मुंबई पोलिसांनी या नरकयातनेतून सुटका केली.  बांगलादेशमधील दादरा गावात राहणाऱ्या २० वर्षीय रेश्माची (नावात बदल) ही आहे कहाणी. अवघी सात वर्षांची असताना आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. वडिलांसोबत राहत असताना त्यांनीही दुसरे लग्न करून घरातून हाकलून दिले. आजी- आजोबांचा रेश्माला आधार मिळाला. शिक्षणासोबतच शिवणकाम सुरू करून तिनेही आजी-आजोबांना आर्थिक आधार दिला. आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आजीने विवाह लावून देत आपले कर्तव्य पार पाडले. लग्नाच्या पहिल्या वर्षीच मुलगी झाली आणि पतीनेही दुसऱ्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून रेश्माला सोडले. लहान मुलगी पदरात असल्याने तिला पुन्हा आजीचा आधार घ्यावा लागला. मुलीच्या चांगल्या संगोपनासाठी ढाका परिसरात कामाच्या शोधात असताना काही महिलांनी तिला चांगले पैसे मिळतील असे सांगत आपल्या सोबत टुरिस्ट पासपोर्टवरून कोलकातामध्ये आणले.

येथे पहिल्यांदा रेश्माला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. मात्र, टुरिस्ट पासपोर्ट संपल्याने या नरकयातनेतून सुटका होऊन ती पुन्हा बांगलादेशला परतली; पण आठवडाभरातच दलालांनी पुन्हा तिला बेकायदा कोलकातामध्ये आणले. दोन वर्षे तेथे वास्तव्यास असताना मैत्रीण माधवी दास हिच्या आई-वडिलांच्या नावाने भारतातील आधार कार्ड बनवून दिले. मुंबईत चांगले काम मिळेल. जास्त पैसे मिळतील, असे सांगून एका महिलेने तिला दलाल सोनू कुमार याच्यासोबत जाण्यास सांगितले. रेश्माने २१ मार्च रोजी मैत्रीण माधवीसोबत मुंबई गाठली. 

अखेर अत्याचाराला वाचा फुटलीसंस्थेतील अधिकरी महिलेने तिला विश्वासात घेत चौकशी केली आणि रेश्माने आपल्यावर बेतलेल्या नरकयातनांना आवाज फोडला. संस्थेने ९ डिसेंबर रोजी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, रेश्माच्या तक्रारीवरून कुंटणखाना चालक रवींद्र, अशोक व सोनू कुमारविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करून अधिक तपास सुरू असल्याचे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी सांगितले.

पळ काढला आणि मागितली मदतसोनू कुमारने तिला नागपाडा येथील एका हॉटेलमध्ये आणून डांबले. पोलीसवाले चेकिंग कर रहे है, सेक्शन गरम है, बांगलादेशी हो, अरेस्ट होगी... असे घाबरवत त्याने रेश्माच्या शरीराची सौदेबाजी सुरू केली. त्यातला एक छदामही रेश्माला दिला नाही. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगले काम मिळेल या एका भाबड्या आशेपोटी ती या नरक यातना सहन करत होती. अखेर, बनारस चाळीमधील एका किचनमध्ये काही दिवस डांबल्यानंतर तिने तेथून पळ काढला. पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, खरी ओळख सांगितली नाही. तिच्याकडे कागदपत्रे नसल्याने, तसेच लहान वाटत असल्याने तिला डोंगरी येथील चिल्ड्रन होम येथे नेले, तेथून कांदिवलीतील होम चिल्ड्रनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी