भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
By जितेंद्र कालेकर | Updated: June 2, 2025 20:48 IST2025-06-02T20:48:13+5:302025-06-02T20:48:38+5:30
नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुडया आणि वेगवेगळया युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे.

भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
जितेंद्र कालेकर
ठाणे: भारतीय नाैदलातील गाेपनीय माहिती पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटीव्ह (पीआयओ) ला देणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याच्या पाेलीस काेठडीत ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्यानंतर त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुडया आणि वेगवेगळया युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे. या पाणबुडया आणि युद्धनाैकांचे नेमके लाेकेशन सांगून काेणती नाैका काेणत्या ठिकाणी उभी आहे, याची माहितीही दिली. वर्माला एटीएसने २९ मे २०२५ राेजी पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत भारतीय नाैदलाची संवेदनशील माहिती
पुरविल्याप्रकरणी अटक केली. ताे पाकिस्तानच्या पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन वेगवेगळया नावांनी चालविण्यात येत असलेल्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात हाेता.
दरम्यान, त्याने काेणत्याही संवेदनशील बाबींची माहिती पाकला पुरविली नसून संबंधित माहिती गूगलवरही उपलब्ध असल्याचा दावा त्याच्या वकीलांनी केला. त्याच्याकडे मिळालेल्या निळया डायरीमध्येही काेणतीही विशेष माहिती नसून त्यात दाेन पानांव्यतिरिक्त काही नाही. काेणाचे नावही नाही. त्यात केवळ आजचे काम काय? आणि उद्याचे काम काय? अशी राेजनिशी आहे. त्याने युद्धनाैकांसह आणखीही काेणती माहिती पाकच्या हेरगिरी करणाऱ्या पीआयओंना दिली, याचा आणखी खुलासा हाेणे बाकी असल्याने त्याच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली. त्याच आधारे त्याच्या काेठडीत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.