शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मोक्का कोर्टाने रवी पुजारीला सुनावली ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

By पूनम अपराज | Updated: February 23, 2021 14:41 IST

Ravi Pujari remanded in Gajalee hotel firing case : गुन्हे शाखा रवी पुजारीची २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात चौकशी करत आहे.

ठळक मुद्दे९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१६ साली  मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत त्याच्याविरुद्ध ४९ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी आज मुंबईतील मोक्का कोर्टात  हजर करण्यात आले. ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१६ साली  मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत त्याच्याविरुद्ध ४९ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पुढील तपास करणाऱ आहेत.

गुन्हे शाखा रवी पुजारीची २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात चौकशी करत आहे. याप्रकरणी पुजारीचे सात साथीदार आधीपासूनच तुरुंगात कैद आहेत. रवी पुजारीवर महाराष्ट्रात एकूण 49 खटले दाखल असून, यातील 26 प्रकरणे मोक्काअंतर्गत आहेत.

पुजारीविरुद्ध मुंबईसह कर्नाटक, बंगळुरू, मंगळुरू आणि गुजरात अशा विविध ठिकाणी दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने स्वतंत्र टोळी करत व्यावसायिक, चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्तींना खंडणीसाठी धमकावले आहे. गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो परदेशातून सर्व सूत्रे हलवत होता.

दोन वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे सेनेगलमध्ये तो पकडला गेला. मात्र, खोटी ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करत पुजारीने भारतातील संभाव्य प्रत्यार्पण रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि कर्नाटक पोलिसांनी अथक प्रयत्न करून तो रवी पुजारीच असल्याचे सिद्ध केले आणि भारतात त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या दीडशेहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्ह्याची कुंडली त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे पुजारीचे भारतात प्रत्यार्पण झाले. तेव्हापासून तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता.

मुंबईत दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पुजारीचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला विलेपार्ले येथे गझाली हॉटेलमध्ये २०१६ साली झालेल्या गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला आहे. शनिवारी बंगळुरू न्यायालयाने गुन्हे शाखेस परवानगी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बंगळुरूला रवाना झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीMumbaiमुंबईMCOCA ACTमकोका कायदाPoliceपोलिसCourtन्यायालयFiringगोळीबार