अभिनेता प्रतीक बब्बरवरील गुन्हा मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:54 IST2018-10-11T23:54:09+5:302018-10-11T23:54:21+5:30
अभिनेता आणि खा. राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या विरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा शेवटी मागे घेण्यात आला. हे प्रकरण समोपचाराने मिटविण्यात आले आहे.

अभिनेता प्रतीक बब्बरवरील गुन्हा मागे
पणजी : अभिनेता आणि खा. राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या विरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून धमकी दिल्याप्रकरणी
दाखल झालेला गुन्हा शेवटी मागे घेण्यात आला. हे प्रकरण समोपचाराने मिटविण्यात आले आहे.
सांताक्रुझ येथील पावलो कुरिया या तरुणाने पर्वरी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, १० आॅक्टोबर २०१८
रोजी सायंकाळी म्हापशाहून पणजीला तो अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होता. आल्तो-पर्वरी येथे ‘दामियान द गोवा’ शोरूमजवळ पोहोचल्यावर प्रतीक बब्बरच्या मोटारने अचानक यूटर्न घेतला. त्यामुळे कुरियाची दुचाकी बब्बरच्या गाडीवर आदळली. अपघात झाल्यानंतर प्रतीक बब्बर तिथे थांबला नाही म्हणून त्याने त्याचे हेल्मेट प्रतीकच्या गाडीच्या दिशेने फेकले. त्यावर संतापून गाडीतून उतरून प्रतीकने पावलोचा गळा पकडला आणि शिवीगाळ केली.
प्रतीक व स्थानिक युवक पावलो कुरय्या यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. परंतु नंतर दोघांनीही हे प्रकरण सामोपचाराने मिटविले. तशी प्रतिज्ञापत्रे दोघांकडूनही पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती पर्वरी पोलिसांकडून देण्यात आली.