शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला दारू पाजून सामूहिक बलात्कार; लॉकडाऊनदरम्यान मिरजमध्ये धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 15:22 IST

लॉकडाऊनदरम्यान पोलिस बंदोबस्त असतानाही मिरजेत रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देतिच्या परिचयाच्या असलेल्या अक्षय राजू कणशेट्टी (वय १९ रा.मंगळवार पेठ मिरज)  व राजू बाबू अच्युदन (वय ३० रा राॅकेल डेपो झोपडपट्टी मिरज)  या दोघांनी तिला बोलावून सोबत नेले.नशेत असलेल्या तरुणीवर दोघांनी बलात्कार करुन नग्नावस्थेत तेथेच सोडून निघून गेले.

मिरज - येथील मिरज रेल्वे स्थानकाजवळ विवाहित तरुणीस दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. गुरुवारी हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसानी दोघांना अटक करुन बलात्कार व दलित अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली. लॉकडाऊनमध्ये बलात्काराच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात सासर व मिरजेत औद्योगिक वसाहतीत बास्तव्य असलेली १९ वर्षीय विवाहिता बुधवारी सायंकाळी रेल्वेस्थानकालगत झोपडपट्टीत राहणार्‍या मैत्रिणीकडे आली होती. यावेळी तिच्या परिचयाच्या असलेल्या अक्षय राजू कणशेट्टी (वय १९ रा.मंगळवार पेठ मिरज)  व राजू बाबू अच्युदन (वय ३० रा राॅकेल डेपो झोपडपट्टी मिरज)  या दोघांनी तिला बोलावून सोबत नेले. तेथून जवळच असलेल्या गजानन हाॅटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तरुणीस दोघांनी दारु पाजली. नशेत असलेल्या तरुणीवर दोघांनी बलात्कार करुन नग्नावस्थेत तेथेच सोडून निघून गेले. मृत तरुणी नग्नावस्थेत पडल्याची एकाने माहिती गांधी चौक पोलीसांना कळविले. माहिती मिळाल्यानंतर गांधी चाैक पोलिसानी तेथे धाव घेतली. यावेळी तिला पीडित तरुणीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. लगेच बेशुद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चाैक पोलीस ठाण्यात राजू अच्युदन व अक्षय कणशेट्टी यांच्याविरुद्ध  बलात्कार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यांत  आला आहे.

लॉकडाऊनदरम्यान पोलिस बंदोबस्त असतानाही मिरजेत रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपीना सात दिवस पोलीस कोठडी दिली. दोघे आरोपी व्यसनी व कोणताही कामधंदा नसलेले आहेत. यापैकी राजू या आरोपीची आई झोपडपट्टीत गांजा विक्रीचा व्यवसाय करते. दारु विक्री बंद असतानाही आरोपींनी दारु कोठून आणली याचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Rapeबलात्कारSangliसांगलीPoliceपोलिसArrestअटक