The rape victim's condition critical due to overdose of sleeping pills | बलात्कार पीडितेने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या, अतिसेवनाने झाली प्रकृती गंभीर

बलात्कार पीडितेने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या, अतिसेवनाने झाली प्रकृती गंभीर

ठळक मुद्देप्यारे मिया (वय 68) असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक वृत्तपत्र चालवितो आणि वेगवेगळ्या प्रसंगी पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

भोपाळमधील एका शेल्टर होमध्ये अति प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचा सेवन केल्यामुले १७ वर्षीय बलात्कार पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्यारे मिया (वय 68) असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक वृत्तपत्र चालवितो आणि वेगवेगळ्या प्रसंगी पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या मिया व्यतिरिक्त त्याचा साथीदार स्वीटी विश्वकर्मा (वय 21) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व पाच पीडितांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भोपाळमधील शासकीय निवारागृहात (शेल्टर होम) ठेवण्यात आले आहे. झोपेच्या गोळ्या घेणारी ही मुलगी एक बलात्कार पीडिता असल्याची माहित आयपीएस अधिकारी यांनी दिली. भोपाळ पोलीसांचे महानिरीक्षक (आयजी) उपेंद्र जैन यांनी सांगितले की, त्या मुलीला सरकारी हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयजी यांनी पुढे असे सांगितले की, भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्याचा अहवाल प्रलंबित आहे. जुलै महिन्यात, पोलिसांनी मियाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले त्यावेळी अश्लील सीडी, हाय एन्ड कार्स, दारूच्या बाटल्या आणि वन्य प्राण्यांची हाडे जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

मिया याच्यावर भारतीय दंड संहितेचे विविध कलमं आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑपरेशन्स अ‍ॅक्टच्या (पॉक्सो) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या फ्लॅटमधून दारू, वन्य प्राण्यांची हाडे जप्त केल्यावर पोलिसांनी एक्ससाईज ऍक्ट आणि वन्यजीव कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअन्वये कारवाई करण्याची विनंती दोन पीडितांकडून केली जात आहे.

Web Title: The rape victim's condition critical due to overdose of sleeping pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.