Rape on Indian Army Doctor: लष्कराच्या महिला डॉक्टरवर दिल्लीच्या हॉटेलमध्ये बलात्कार; आरोपी राजस्थानात पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 17:53 IST2022-02-16T17:53:14+5:302022-02-16T17:53:43+5:30
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यात आला.

Rape on Indian Army Doctor: लष्कराच्या महिला डॉक्टरवर दिल्लीच्या हॉटेलमध्ये बलात्कार; आरोपी राजस्थानात पोहोचला
दिल्लीच्या आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये तैनात असलेल्या महिला डॉक्टरवर दिल्लीतील हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसानी रजनीश शर्मा याला जयपूरमधून ताब्यात घेतली आहे.
दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनुसार ११ फेब्रुवारीला करोल बाग पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्य़ात आली. तक्रारदार महिला डॉक्टरने सांगितले की, तिला लग्नाचे आमिष दाखविण्यात आले आणि हॉटेलमध्ये नेत शारीरिक संबंध ठेवण्यात आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यात आला. तेव्हा असे समजले की, दोघांची ओळख एका चॅटिंग अॅपवर झाली होती. पीडित महिला डॉक्टर दिल्लीमध्ये लष्कराच्या ह़ॉस्पिटलमध्ये नोकरी करते.
पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलान्सची मदत घेत आरोपीचा ठावठिकाणा शोधला. १३ फेब्रुवारीला राजस्थानच्या जयपूरमधून त्याला अटक करण्यात आसली. पुढील तपास सुरु आहे.