मालाड स्थानक परिसरात लोकलमध्ये हेडफोन्स विकणाऱ्या अंध मुलीवर बलात्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:54 AM2022-01-28T08:54:31+5:302022-01-28T08:55:15+5:30

पुण्याच्या ससून रुग्णालयाने दिली बोरीवली रेल्वे पोलिसांना माहिती

Rape of a blind girl in Malad station area? | मालाड स्थानक परिसरात लोकलमध्ये हेडफोन्स विकणाऱ्या अंध मुलीवर बलात्कार?

मालाड स्थानक परिसरात लोकलमध्ये हेडफोन्स विकणाऱ्या अंध मुलीवर बलात्कार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड रेल्वेस्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीने बलात्कार करत मोबाइल पळवून नेल्याचा आरोप २५ वर्षीय अंध मुलीने केला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान ती गर्भवती असल्याचे उघड झाल्यावर बोरीवली रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलीस तपास करत आहेत.

पीडित मुलगी ही लोकलमध्ये मोबाइल हेडफोन्स आणि अन्य सामग्री विकायची. बोरिवली रेल्वे पोलिसांना ससून रुग्णालयातून दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. यात मालाड रेल्वे स्थानकावर तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलीवर अनोळखी व्यक्तीने बलात्कार केला. तसेच तिचा मोबाइलही पळवून नेला. पोटात दुखू लागल्याने ती ससून रुग्णालयात उपचारासाठी गेली तेव्हा ती गर्भवती असल्याचे तिला समजले, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा बोरिवली रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी अहमदनगरच्या केडगाववरून उस्मानाबाद, लातूर, खेड करत उल्हासनगरला गेली. तिथे चार दिवस राहिल्यावर ती लोकलने मालाड स्थानकात आली. त्यानंतर पुन्हा रेल्वेने ती लातूरला गेली व तिथे तीन महिने राहून नंतर तिने स्वारगेट गाठले. त्या ठिकाणी मैत्रिणीच्या मदतीने ती  कामावर राहिली. तिथे तिच्या पोटात दुखू लागल्याने ती ससूनला गेली तेव्हा  ती गर्भवती असल्याचे उघड झाले.

असा प्रकार घडणे कठीणच
बोरीवली पोलिसांच्या हद्दीत २५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच रेल्वे पोलीस व आरपीएफचा येथे मोठा बंदोबस्त असतो. त्यामुळे मालाड रेल्वेस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात असा प्रकार घडणे कठीणच आहे. मात्र आम्ही गुन्हा दाखल केला असून तथ्य पडताळणी सुरू आहे.
- अनिल कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे

Web Title: Rape of a blind girl in Malad station area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.