शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Rape in UP: घरी गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; बलात्कार झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:00 IST

उत्तर प्रदेश : अत्याचार न झाल्याचा पोलिसांनी केला दावा, तीन जणांना अटक

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामध्ये बलात्कारपीडित दलित मुलीने (१५) मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच राज्यातील हाथरस जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणाने देशभर संताप उसळला असतानाही अशा घटना थांबण्यास तयार नाहीत.चित्रकूट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित मित्तल यांनी सांगितले की, या दलित मुलीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या ८ ऑक्टोबरला गावानजीकच्या जंगलामध्ये या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला होता, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चित्रकूट जिल्ह्यात ज्या गावी हे प्रकरण घडले तेथील माजी सरपंचाचा मुलगा किशन उपाध्याय व आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बलात्कारपीडित दलित मुलीची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा तिच्या कुटुंबियांनी केलेला आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. दलित मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार याआधी तिच्या एकाही नातेवाईकाने येऊन नोंदविली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. चित्रकूटमधील दलित मुलीवर बलात्कार झालेला नाही, असा निष्कर्ष तिच्या शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे, अशी माहिती चित्रकूट पोलिसांनी दिली आहे. तिच्या उत्तरीय तपासणीसाठी वापरलेल्या नमुन्यांची आता फोरेन्सिक तपासणीही होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दलित मुलीवर बुधवारी तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेल्या बलात्कारानंतरही त्या राज्यात बलात्काराच्या आणखी घटना दररोज उजेडात येत आहेत.पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाहीउत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या दलित मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, तीन जणांनी माझ्या मुलीचे अपहरण करून तिला गावानजीकच्या जंगलात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तिला तसेच टाकून आरोपी तिथून निघून गेले. सरतेशेवटी पोलिसांनी तिला शोधून काढले व घरी आणून सोडले. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस