शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागरमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 19:45 IST

सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चिमुकली आई-वडिलांसोबत घरात झोपली. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास नराधमाने आई शेजारी झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेले.

पिंपरी : आई-वडिलांसोबत घरात झोपलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून नराधमाने उचलून नेले. बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह लष्कराच्या मोकळ्या मैदानात टाकून दिला. ही खळबळजनक घटना पिंपळे सौदागर येथे मजुरांच्या कामगार वसाहतीत घडली.  सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. पिंपळे-सौदागर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी पीडित चिमुकलीचे आईवडील मजुरीचे काम करतात. हे मजूर दाम्पत्य मूळचे छत्तीसगडचे आहे. पिंपळे सौदागरमधील लेबर कॅम्पमध्ये हे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चिमुकली आई-वडिलांसोबत घरात झोपली. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास नराधमाने आई शेजारी झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेले. आईला पहाटे जाग आल्यानंतर चिमुकली आसपास कोठेच दिसली नाही. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली; मात्र ती आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांसह  नातेवाईक चिमुकलीचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतील मोकळ्या जागेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनात चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.

टॅग्स :pimpale saudagarपिंपळे सौदागरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारMurderखून