शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास जन्मठेप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:35 IST

आज दोषी ठरवलेल्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला आहे. 

ठळक मुद्दे१८ तास डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास न्यायलयाने बुधवारी १६ जानेवारीला दोषी ठरवले. चाळीसगाव येथील डॉ. उत्तमराव धनाजी महाजन (वय ६२) यांचे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आहे. तसेच ते तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

जळगाव - चाळीसगाव येथील शैक्षणिक संस्थाचालकाकडून तक्रार अर्जाची चौकशीच्या नावाने त्यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी १८ तास डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्यासह एकास न्यायलयाने बुधवारी १६ जानेवारीला दोषी ठरवले. आज दोषी ठरवलेल्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला आहे. 

तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक मनोज प्रभाकर लोहार (वय ४५,) व धीरज यशवंत येवले (वय ४७) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव रावसाहेब निंबाळकर (वय ५९) यांना निर्दोष सोडले आहे. चाळीसगाव येथील डॉ. उत्तमराव धनाजी महाजन (वय ६२) यांचे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आहे. तसेच ते तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य होते. महाविद्यालय आवारातील काही बांधकाम करण्यासाठी त्यांनी पुरूषोत्तम वल्लभभाई पटेल उर्फ दास, मनुभाई आणि आणखी एक अशा तिघांना ठेका दिला होता. परंतु, बांधकाम साहित्य महाजन यांनी दिल्यास मजुरीवर काम करण्यास तयार झाले होते. दरम्यान, तिन्ही ठेकेदारांनी महाजन यांच्याविरुद्ध तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर चौकशी करण्याच्या निमित्ताने ३० जून २००९ रोजी सकाळी ११ वाजता उपनिरीक्षक निंबाळकर व त्यांच्यासोबत आलेल्या दोन जणांनी महाजन यांना लोहारांच्या कार्यालयात नेले. तेथे लोहार यांनी महाजनांना धमकावण्यास सुरुवात केली. तेथे धीरज येवले या मध्यस्थांकडून ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्यासाठी लोहार यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी तब्बल १८ तास महाजन यांना डांबून ठेवले होते. त्यांचा मुलगा मनोज याने तत्कालिन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांना फॅक्स करून मनोज लोहार यांची तक्रार केल्यानंतर महाजन यांची सुटका करण्यात आली होती. यानंतर २ जूलै २००९ रोजी पोलिस अधीक्षक रस्तोगी यांनी घटनेची चौकशी करून अहवाल पोलिस महासंचालकांना पाठवला होता. १६ जूलै २००९ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात लोहार, येवले व निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यानंतर गुन्ह्याचा तपास करुन तत्कालीन सीआयडी अधिकाऱ्यांनी दोषारोप दाखल केले होते. या खटल्यात न्यायाधिश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सरकार पक्षाने एकूण १६ तर बचावपक्षाने दोन साक्षीदार तपासले. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. पंकज अत्रे व अविनाश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, विनोद चौधरी, महेंद्र पाटील व गणेश सोनवणे यांनी सहकार्य केले.   

 

टॅग्स :KidnappingअपहरणJalgaonजळगावExtortionखंडणीPoliceपोलिस