शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाच्या निर्घृण खुनाचा लागला छडा ; ' ही 'गोष्ट ठरली पोलिसांसाठी महत्वाचा दुवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 16:59 IST

वानवडीतील बारा वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.

ठळक मुद्देकोंढवा पोलिसांना गुन्ह्याची उकल व आरोपींना जेरबंद करण्यात यश

पुणे : वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात हेवन पार्क सोसायटी रोडवरील १२ वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात कोंढवापोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन वानवडी पोलिसांचा ताब्यात देण्यात आल्या. 

रोहित गौतम बनसोडे (वय २७, रा. उंड्री), अजय विजय गायकवाड (वय २२, रा़ कृष्णानगर, महंमदवाडी रोड), श्रीकांत भिमराव साठे (वय २०, रा. कृष्णानगर), अक्षय अनिल जाधव (वय २०, रा. आझादनगर, वानवडी) अशी त्यांची नावे आहेत. अझान झहीर अन्सारी (वय १२ वर्ष, रा.शिवनेरी, कोंढवा खुर्द) असे खुन झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला होता. जंगलाचा भाग असल्याने खुनाविषयी अथवा अन्य कोणताही पुरावा नव्हता.

दरम्यान, अन्सारी याच्या आईने आपला मुलगा हरविल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. त्यामुळे वानवडी पोलिसांबरोबरच कोंढवा पोलीस याचा तपास करीत होते. त्यात अझान अन्सारी हा लहान असला तरी अनेक गुन्हे करीत होता. रोशन अजित सिंग यांची पान टपरी असून अन्सारी याने त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर टपरी जाळू अशी धमकी दिली होती. सतिश गायकवाड यालाही अन्सारीविषयी राग होता.त्यातून रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अशोका म्युजसमोरुन दुचाकीवरुन त्याला पुण्यधाम रोडने महंमदवाडी येथून गणेशनगर मैदान येथे नेले. तेथे सतिश गायकवाड, अजय गायकवाड, श्रीकांत साठे, अक्षय जाधव हे चौघे आले.त्या सर्वांनी अन्सारी याला लक्ष्मी पार्क जंगल परिसरात नेले. तेथे दारु पाजून त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगड मारुन खून केला होता. त्यातील सतिश गायकवाड हा फरार आहे.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, सुशिल पवार, निलेश् वणवे, अमित साळुंखे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांनी ही कामगिरी केली.  यांनी ही कामगिरी केली. …...

‘श्री’ स्टिकर ठरला महत्वाचा दुवाया खुनामध्ये कोणतेही धागे दोरे नव्हते.अन्सासी याला दोघे जण दुचाकीवरुन घेऊन जात असताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. परंतु, त्यावरील नंबरप्लेट दिसत नव्हती. अशावेळी पोलीस शिपाई किशोर वळे यांना त्यांच्या बातमीदाराने अन्सारीला ज्या गाडीवरुन नेले होते. ती गाडी साई मेडिकलसमोर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही गाडीची तपासणी केल्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दुचाकीवर श्री हे स्टिकर याही दुचाकीवर असल्याने ही गुन्ह्यातील गाडी असल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीला नंबरप्लेट नव्हते.ती रोशन अजितसिंग याच्या घराबाहेर उभी असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीPoliceपोलिसMurderखूनKondhvaकोंढवा