पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे रंगाऱ्यावर दोघांचा चाकूने हल्ला

By अजित मांडके | Updated: August 22, 2023 17:32 IST2023-08-22T17:31:48+5:302023-08-22T17:32:01+5:30

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

Rangara was attacked by two people with a knife due to a dispute over money transactions | पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे रंगाऱ्यावर दोघांचा चाकूने हल्ला

पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे रंगाऱ्यावर दोघांचा चाकूने हल्ला

ठाणे: पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे ऋषीकेश सहाणी (५१, रा. पाचपाखाडी, ठाणे) या रंग काम करणाऱ्यावर गणेश निशाद आणि त्याचे साथीदार  अजय निशाद, आकाश मिश्रा तसेच अन्य एक अशा चौघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.     

दोन वर्षांपूर्वी पाचपाखाडीतील रहिवाशी लोहर साहणी यांनी त्यांच्या ओळखीतील गणेश निशाद (५१, रा. लोकमान्यनगर, ठाणे) यास भांडूप येथे मिस्त्रीचे काम दिले होते. हे काम त्यांनी अर्धवट सोडले होते. या कामाचे पैसे तेथील मालकाने दिले नाही, यासाठी गणेश निशाद आणि त्याची मुले ऋषिकेश सहाणी याचा मोठा भाऊ लौहर सहाणी याच्याकडे पैशांची वारंवार मागणी करीत होते. २० आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कचराळी तलाव भागात गणेश निशाद आणि ऋषिकेश यांच्यात याच पैशांच्या व्यवहारावरुन वाद झाला. याच वादातून गणेश निशाद आणि त्याचे साथीदार अजय निशाद, आकाश मिश्रा तसेच अन्य एक अशा चौघांनी मिळून ऋषिकेश याच्या कपाळावर, कानावर चाकूने खूनी हल्ला केला. याप्रकणी चौघांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात २१ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Rangara was attacked by two people with a knife due to a dispute over money transactions