Rakesh Maria Book : अशी झाली गुलशन कुमार यांची हत्या; राकेश मारियांची खळबळजनक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 08:12 PM2020-02-19T20:12:24+5:302020-02-19T20:22:54+5:30

गुलशन कुमार यांचं नाव गाजत असताना मला फोन आला आणि मला माझ्या खबऱ्याने गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची धक्कादायक माहिती मारियांना दिली.

Rakesh Maria Book: Like this Gulshan Kumar murdered; sensative information told Rakesh Maria | Rakesh Maria Book : अशी झाली गुलशन कुमार यांची हत्या; राकेश मारियांची खळबळजनक माहिती 

Rakesh Maria Book : अशी झाली गुलशन कुमार यांची हत्या; राकेश मारियांची खळबळजनक माहिती 

googlenewsNext
ठळक मुद्देसर... गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है अशी माहिती मला माझ्या संपर्कात असलेल्या एका खबऱ्याने दिली होती. त्यानंतर मी गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका असल्याबाबत तातडीने गुन्हे शाखेला माहिती दिली होती.

मुंबई -  लेट मी से इट नाऊ (Let Me Say it Now) या राकेश मारिया यांच्या पुस्तकातून कालपासून अनेक धक्कादायक घटनांचा गौप्यस्फोट होत आहेत. या पुस्तकातल्याच एका उल्लेखानुसार टीसीरिजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची माहिती आपल्याला आधीच मिळाली होती असं राकेश मारियांनी म्हटलं आहे.

सर...गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है’, मी त्याला विचारलं कौन गिरानेवाला है विकेट?तर खबरी उत्तरला की, अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहींपे काम खतम करने वाले है, अशी माहिती मला खबऱ्याने दिली. नंतर मी त्याला विचारलं की खबर पक्की है क्या तर तो म्हणाला साहब एकदम पक्की खबर है, नहींतो आपको कैसे बताता?” मी त्याला म्हटलं की और कुछ खबर मिले तो बताना असं म्हणून मी त्याचा फोन ठेवला आणि विचारात पडलो की आता काय करावं?” “दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिला फोन महेश भट यांना केला. त्यांना विचारलं की तुम्ही गुलशन कुमारना ओळखता का? ते म्हणाले हो.. मी त्यांचा एक सिनेमाही दिग्दर्शित करत आहे. सकाळीच माझा फोन आलेला पाहून महेश भट हे काहीसे चकीत झाले. मात्र, त्यांनी मला गुलशन कुमार हे रोज शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात ही माहिती दिली. 

त्यानंतर मी गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका असल्याबाबत तातडीने गुन्हे शाखेला माहिती दिली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करा. तसेच मला त्यांच्या बाबतची माहिती देत रहा. मात्र १२ ऑगस्ट १९९७ रोजी मला गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. आपण त्यांना पोलीस संरक्षण दिलं होतं. यानंतर मी जी चौकशी केली त्यात समजलं की उत्तर प्रदेश पोलीस आणि कमांडो यांनी गुलशन कुमार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संरक्षण काढून घेतले होते. असा सर्व खुलासा राकेश मारियांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे.


गुलशन कुमार ही व्यक्ती कॅसेट जगतात ख्यातनाम व्यक्ती म्हणून ओळखली जायची. त्यांनी टीसीरिज ही कॅसेट कंपनीही सुरु केली. अवघ्या काही वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. तसेच त्यांनी नव्या गायकांना संधी देण्यास सुरुवात केली. तसेच देवांची गाणी गुलशन कुमार यांनी मोठ्या प्रमाणावर बाजारात आणली. गुलशन कुमार यांचं नाव मार्केटमध्ये गाजत असताना मला फोन आला आणि मला माझ्या खबऱ्याने गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची धक्कादायक माहिती मारियांना दिली.

 

Web Title: Rakesh Maria Book: Like this Gulshan Kumar murdered; sensative information told Rakesh Maria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.