शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डला भेटायला गेलेल्या तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, लघवी पिण्यासही भाग पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 11:47 IST

असे सांगितले जात आहे की, तरूण आपल्या गर्लफ्रेन्डला भेटायला गेला होता. ज्यामुळे मुलीच्या घरातील लोक भडकले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

राजस्थानमध्ये सतत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. एक  व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण केली जात आहे. सोबतच त्याला लघवीही पिण्यास भाग पाडलं  आहे. असे सांगितले जात आहे की, तरूण आपल्या गर्लफ्रेन्डला भेटायला गेला होता. ज्यामुळे मुलीच्या घरातील लोक भडकले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

हा व्हिडीओ साधारण १५ दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित तरूणाला बोलवून तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी पीडित तरूणाने एकूण चार  लोकांवर गंभीर आरोप लावले. या केसमध्ये पीडित व्यक्तीवर कुणाच्यातरी घरात घुसण्याचा आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, ही घटना ८ मार्चची आहे. तरूण गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी कोशलू गावात गेला होता. त्याला बघून मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली. (हे पण वाचा : तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती)

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका तरूणाला मारहाण केली जात होती. सोबतच काही प्यायलाही दिलं होतं. तपासातून समोर आलं की, तरूण ड्रायव्हर म्हणून काम करतो. (हे पण वाचा : विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात)

पोलिसांनी पीडित तरूणाच्या वडिलांना संपर्क केला. त्यानंतर पीडित तरूणाच्या वडिलांनी दोन आरोपींबाबत सांगितलं. दोन्ही आरोपींनी आधी त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला लघवी पिण्यास भाग पाडलं. सोबतच हे कुणाला सांगितलं तर वाईट होईल अशी धमकीही त्याला दिली. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती.

आता याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोबतच आरोपींना पकडण्यासाठी टीम नेमल्या आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहे. जे यात दोषी आढळतील त्यांच्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी