शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान हादरले! एकाचवेळी २० महिलांवर सामुहिक बलात्कार; नगरपरिषदेच्या सभापती, आयुक्तांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:37 IST

महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त झाले होते. तिथे १०-१५ लोक जाब विचारताच हसत होते. धक्कादायक प्रकार.

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी २० महिलांवर सामुहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. यापैकी एका महिलेने पोलिसांत धाव घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले आहे. सिरोही नगर परिषदेच्या सभापती आणि तत्कालीन आयुक्तांविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंगणवाडी सेविका बनवण्याच्या नावाखाली सभापती महेंद्र मेवाडा आणि तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांनी तक्रारदार महिलेसह १५ ते २० महिलांना बोलविले होते. त्यांना खायच्या पदार्थातून गुंगीचे औषध देण्यात आले. यानंतर मेवाडा आणि चौधरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलांवर गँगरेप केला, या महिलांचा व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेलही करण्यात येत असल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. 

दोन-तीन महिन्यांपूर्वी ही महिला अंगणवाडीत काम करण्यासाठी तिच्या सहकारी महिलांसोबत सिरोही येथे आली होती. नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी त्यांनी अध्यक्ष आणि आयुक्तांची भेट घेतली होती. या दोघांनी त्यांच्या ओळखीने एका घरात राहण्याची आणि जेवणाची सोय केली. या जेवणात त्यांना गुंगीचे औषध देण्यात आले होते. महिला बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त झाले होते. तिथे सभापती व आयुक्त होते. त्यांच्यासोबत १०-१५ साथीदार होते. त्यांना विचारले असता हे सर्व लोक हसायला लागले. याचसाठी तुम्हाला इथे बोलावले होते, असे सांगितले गेले. महिलांना त्यांच्यासोबत काय घडले याची कल्पना आली होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांचे व्हिडीओ काढून पाच पाच लाख रुपये मागितले जात होते. नाहीतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. 

पोलीस म्हणतायत तक्रार खोटी...याचबरोबर अन्य लोकांसोबतही शरीर संबंध बनविण्यास भाग पाडले जात होते. या आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून या महिलांकडून कोरे कागद आणि स्टँप पेपरवर सह्याही घेतल्या आहेत. या महिलांनी सिरोही पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ती खोटी असल्याचे आढळून आले होते, असे डीवायएसपी पारस चौधरी यांचे म्हणणे आहे. आता यापैकी ८ महिला या राजस्थान हायकोर्टात गेल्या आहेत. तिथून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानMolestationविनयभंग