डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 08:58 AM2021-09-12T08:58:26+5:302021-09-12T09:00:16+5:30

Vodafone Idea: कंपनीच्या माहितीशिवाय डुप्लिकेट सिम बनविता येत नाही. यामुळे एका ग्राहकाचे 27.5 लाख रुपये हॅकरने हडप केले. जर व्होडाफोनने य़ा ग्राहकाचा त्याचे पैसे एक महिन्याच्या आत दिले नाहीत तर त्यावर 10 टक्क्यांचे व्याज आकारले जाईल असे आदेशात म्हटले आहे. 

Rajasthan IT Department order Vodafone Idea to pay customers money after Duplicate sim Fraud | डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार

डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार

Next

केंद्र सरकार आणि केंद्रीय बँकांचे एवढे कडक नियम असताना देखील गुन्हेगार फसविण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. डुप्लिकेट सिमद्वारे ऑनलाईन फ्रॉड केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जात बुडालेल्या व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनीची संकटे काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. राजस्थानच्या आयटी विभागाने कंपनीला डुप्लिकेट सिममुळे एका ग्राहकाला झालेले 27.5 लाख रुपये आणि व्याजाचे 2.31 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. (Rajasthan IT Department order Vodafone Idea to pay customers money after Duplicate sim Fraud.)

कंपनीच्या माहितीशिवाय डुप्लिकेट सिम बनविता येत नाही. यामुळे एका ग्राहकाचे 27.5 लाख रुपये हॅकरने हडप केले. जर व्होडाफोनने य़ा ग्राहकाचा त्याचे पैसे एक महिन्याच्या आत दिले नाहीत तर त्यावर 10 टक्क्यांचे व्याज आकारले जाईल असे आदेशात म्हटले आहे. 
धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीने ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनशिवाय डुप्लिकेट सिम कार्ड जारी केले. याद्वारे त्या गुन्हेगाराने त्या ग्राहकाच्या खात्यातून 68.5 लाख रुपये लंपास केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कंपनीने भानुप्रताप नावाच्या व्यक्तीला हे डुप्लिकेट सिम जारी केले होते, हा नंबर दुसऱ्याच व्यक्तीचा होता. प्रतापने त्या व्यक्तीच्या खात्यातून आईडीबीआय बँकेतून 68. लाख रुपये आपल्या खात्यात वळते केले. तक्रारीनंतर 44 लाख रुपये त्या ग्राहकाच्या खात्यात वळते करण्यात आले. परंतू तोवर प्रतापने 27.5 लाख रुपये उडविले होते. ही रक्कम अद्याप त्या ग्राहकाला मिळालेल नाही. 

25 मे 2017 मध्ये कृष्ण लाल नैन यांचा व्होडाफोन नंबर बंद झाला होता. तेव्हा त्यांनी याची तक्रार व्होडाफोनच्या स्टोअरमध्ये केलेली. मात्र, त्यांना नंबर चालू करून देण्यात आला नाही. अखेर त्यांनी दुसऱ्या गॅलरीमध्ये जात तक्रार दिली, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांचा नंबर सुरु झाला. मात्र, तोवर त्यांचे पैसे गेलेले होते. 

Web Title: Rajasthan IT Department order Vodafone Idea to pay customers money after Duplicate sim Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.