शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना आणि भावाला घरात कोंडून 5 नराधमांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:03 IST

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे.

भरतपूर - राजस्थानात सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. यातच आता, भरतपूर येथे सामूहिक बलात्काराची हादरवून सोडणारे घटना समोर आली आहे. भरतपूरमधील एका गावातील व्यक्तीने गावातीलच 5 जणांविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यात, या पाचही जणांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे.

गुन्हा दाखल -यासंदर्भात बोलताना तपास अधिकारी अनिल मीना म्हणाले, एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  गावातील 5 बदमाशांनी त्याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यासह त्यांच्या 9 बिघा शेतातील पिकालाही आग लावली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच बोरब, पूर्वीही या दोन्ही बाजूंच्या लोकांत भांडणे आणि POCSO अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते.

17 ऑक्टोबरची घटना - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या, पीडितेला सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास केला जात असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पीडित पक्षाकडूनही माहिती मिळवली जात आहे. याचबरोबर आरोपींचा शोधही सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगRajasthanराजस्थान