शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्याच्या मुलाने डान्सरचा केला विनयभंग, गुन्हा दाखल; नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:48 IST

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्सर तरुणींचा काँग्रेस नेत्याच्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

विनयभंगाचे हे प्रकरण राजस्थान येथील बुंदीच्या तळेदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. रविवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत हा सर्व प्रकार घडला. 

आरोपींनी अश्लील कृत्य करत डान्सरचा विनयभंग केल्याचा आरोप तक्ररदाराने केला आहे. यावेळी डान्सरने विरोध केला असता आरोपीने तिला धक्काबुक्की करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल हिसकावले. त्यामुळे तेथील वातावरण बिघडले. यानंतर सर्व डान्सरांनी पळ काढला. दरम्यान, हिसकावलेल्या मोबाईलमध्ये डान्सरतचा वैयक्तिक डेटा अपलोड केल्याने आरोपीने तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'८० हजार पोलीस काय करत आहेत, अमृतपाल प्रकरणात यंत्रणा अपयशी'; हायकोर्टाने पंजाब पोलिसांना फटकारलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेदा पोलीस स्टेशन हद्दीतील बलोप गावात असलेल्या एका फार्म हाऊसवर काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या बर्थडे पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोटा येथून ऑर्केस्ट्रा ग्रुप आला होता. यावेळी बुंदी जिल्ह्यातील एका नगरपालिकेच्या अध्यक्षांचा मुलगा राजू गुर्जरही आपल्या मित्रांसह या पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. याठिकाणी राजू गुर्जर आणि कालू बरमुंडा यांनी त्यांच्या साथीदारांसह डान्सरसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या संचालकाने गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसPoliceपोलिस