शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:08 IST

Raja-Sonam Raghuvanshi Case: या प्लॅनिंगवेळी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह मेघालयला जाण्याऐवजी इथेच इंदूरमध्ये थांबला.

इंदूर - राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांनी संपूर्ण प्लॅनिंग केल्याचे उघड झाले. राजाची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती असं तपासात पुढे आले परंतु त्यानंतर हत्येत सहभागी ३ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून राज कुशवाहचे मित्र असल्याचे समोर आले.

मित्रांना हत्येसाठी कसं तयार केले?

माहितीनुसार, १६ मे रोजी राजने हत्येचे षडयंत्र रचलं आणि इंदूरच्या एका कॅफेमध्ये त्याच्या बालपणीच्या तीन मित्रांची भेट घेतली. त्याने मित्रांना हत्येसाठी पैशाचं आमिष दिले होते. राजने त्याच्या तिन्ही मित्रांना २० मे रोजी मेघालयला पाठवले जेव्हा सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हनीमूनसाठी रवाना झाले होते.  

मित्रांनी केला मर्डर

या प्लॅनिंगवेळी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह मेघालयला जाण्याऐवजी इथेच इंदूरमध्ये थांबला. शिलांग पोलिसांच्या माहितीनुसार राजने पडद्यामागून हत्याकांड घडवून आणला. तो सातत्याने सोनमच्या संपर्कात होता. हत्येदिवशी सोनम तिच्या पतीला घेऊन एका निर्जनस्थळी घेऊन गेली. जिथे या ३ जणांनी राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि त्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकून दिला. 

सर्व आरोपी अटकेत सध्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी, हत्येचा मास्टरमाईंड तिचा प्रियकर राज कुशवाह आणि हत्या घडवून आणणाऱ्या तिघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूरला आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केले त्यानंतर इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. आनंद कुमार, आकाश राजपूत, विक्की उर्फ विशाल ठाकूर असं या आरोपींची नावे आहेत. हे सर्व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. आनंद कुमारला उत्तर प्रदेशच्या बिना जिल्हा, आकाश राजपूतला ललितपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली तर विक्की ठाकूरला इंदूरमध्ये अटक केली आहे.

लग्नाच्या १७ दिवसांनीच पतीला संपवले

सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी पार पडले होते. त्यानंतर दोघंही हनिमूनसाठी शिलाँगला गेले. मात्र २ जून रोजी, राजाचा मृतदेह एका दरीजवळील खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनमने मेघालय सोडून इंदूर गाठलं आणि तिथे भाड्याच्या घरात वास्तव्य केलं. काही काळाने ती गाजीपूरकडे रवाना झाली, जिथे तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी