शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:33 IST

गेल्या ११ मे रोजी सोनमचे लग्न झाले. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार आली. याच काळात राजाची हत्या करण्यात आली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला...

शिलॉन्ग पोलिसांनी राजा रघुवंशी मर्डर केसमधील आरोपी पत्नी सोनम रघुवंशीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. यासंदर्भात खुद्द सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी माहिती दिली. सोनमचे आई-वडील आणि भाऊ गोविंद यांना पोलिसांनी काही प्रश्न विचारले. सोनमच्या वागण्या-बोलण्यासंदर्भात आणि कामासंदर्भात प्रश्न करण्यात आले. सोनमच्या घरात ठेवलेल्या वस्तूंचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, आपण संजय वर्मा नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे गोविंद रघुवंशी यांनी म्हटले आहे.सोनमच्या कुटुंबीयांना विचारण्यात आलेले प्रश्न -

सोनमचे वर्तन कसे होते?सोनमचे लग्नापूर्वी आणि नंतरचे वर्तन कसे होते?राजाच्या घरून आल्यानंतर सोनमच्या वर्तनात काही फरक जाणवला?सोनम फोनवर बराच वेळ कुणाला बोलत होती?सोनम आणि राजच्या प्रेमसंबंधाची काही कल्पना होती का?सोनमने आईने लग्न न करण्याची धमकी दिली होती का?सोनम शिलाँगला गेल्याची माहिती केव्हा मिळाली?राज व्यतिरिक्त इतर आरोपींचे घरी येणे जाणे होते का?सोनमच्या खात्यात एवढे पैसे कुणाचे होते आणि ते कुठून आले?हवाला कनेक्शन, संजय वर्मा आणि जितेंद्र रघुवंशी यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले

सोनमने गुन्हा कबूल केला - पोलीसमेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबूल केला आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहच्या साथीने तिच्या पतीची हत्या केली. मंगळवारी (१७ जून) पोलिसांनी हत्येत वापरलेले दुसरे शस्त्रही जप्त केले. राजा रघुवंशीवर दोन शस्त्रांनी वर करण्यात आले आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

२ जूनला सापडला राजाचा मृतदेह - गेल्या ११ मे रोजी सोनमचे लग्न झाले. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार आली. याच काळात राजाची हत्या करण्यात आली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. ९ जून रोजी सोनम रघुवंशीला गाझीपूरमध्ये अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस