शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:30 IST

Raja Raghuvanshi : शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम बेपत्ता होती. मात्र आता सोनमला अटक करण्यात आली आहे.

शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम बेपत्ता होती. मात्र आता सोनमला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून पकडलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून सोनमचा शोध घेतला जात होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचं आधीच दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे पती राजाला मारण्याचा कट रचण्यात आला. राजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शिलाँगला नेण्यात आलं, जिथे त्याची सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली. राजा रघुवंशी आणि सोनमचं ११ मे रोजी इंदूरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झालं. कुटुंब आनंदी होतं. २० मे रोजी दोघेही शिलाँगला हनिमूनसाठी निघाले. 

"शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

२२ मे रोजी हे जोडपे नोंगरियाट गावातील शिप्रा होमस्टे येथे राहिलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता चेक आउट केलं आणि तेव्हापासून दोघांचेही मोबाईल बंद होते. २४ मे रोजी मावलाखियाटपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये स्कूटी बेवारस आढळली. त्यानंतर, राजा आणि सोनमचे सामान जंगलात सापडलं आणि २ जून रोजी राजाचा मृतदेह वेसावडोंग धबधब्याच्याजवळ एका खोल दरीत आढळला. त्याच्या हातावरील टॅटूवरून त्याची ओळख पटली.

नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?

१७ दिवसांनी सोनमने केला फोन

९ जून रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान सोनम गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यावर पोहोचली. तिथून तिने ढाबा ऑपरेटरचा फोन घेतला आणि तिच्या भावाला व्हिडीओ कॉल केला आणि ती गाजीपूरमध्ये असल्याचं सांगितलं. भावाने ताबडतोब इंदूर पोलिसांना माहिती दिली, त्यांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सोनमला वैद्यकीय तपासणीसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. तपासात कोणतीही जखम किंवा मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत. 

"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी

सोनमने राजाला संपवण्याचा रचला कट

सोनमचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघेही संपर्कात होते. सोनमने राजाला संपवण्याचा कट रचला आणि तिच्या प्रियकरासह शिलाँगमध्ये त्याची हत्या केली. राजाच्या हत्येत एकूण चार जणांचा सहभाग होता. त्यापैकी तिघांना इंदूरमधून अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी उत्तर प्रदेशचा आहे जो सध्या फरार आहे. मेघालयचे डीजीपी एल. नोंगरांग यांनी पुष्टी केली आहे की इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनमची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक