शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:03 IST

Raja Raghuvanshi and Sonam Latest Video: हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या आणि अचानक बेपत्ता झालेल्या सोनम आणि राजाचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चार मिनिटांचा आहे.

Raja Raghuvanshi and Sonam Case Latest Update: लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगमध्ये गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनमसोबत काय घडले, हा गुंता अजूनही सुटलेला नाही. राजाचा मृतदेह सापडला, पण सोनमबद्दल अजूनही काहीही कळालेले नाहीत. तपास सुरू असतानाच एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. चार मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सोनम आणि राजा दिसत आहेत. स्कूटरवरून होमस्टेला आले आणि परत जाताना ते दिसत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टी७ न्यूज या वृत्तवाहिनीने पहिल्यांदा हा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम आणि राजा दिसत आहेत. राजाच्या मृतदेहाजवळ महिलेचा एक पांढरा शर्ट सापडला होता. या व्हिडीओमध्ये सोनमच्या अंगावर पांढरा शर्ट दिसत आहे. 

राजा आणि सोनमचा शेवटचा सीसीटीव्ही व्हिडीओ

चार मिनिटे आणि ५३ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. सुरूवातीला दोघेही स्कूटरवरून शिलाँगमधील एका होमस्टेच्या बाहेर येऊन थांबतात. दोघांच्या अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट दिसत आहे. त्यांच्याजवळ एक पांढर्‍या रंगाची बॅग आहे. 

स्कूटर उभी केल्यानंतर दोघेही खाली उतरतात. दोघे एकमेकांशी बोलताना दिसतात. त्यानंतर राजा होमस्टेच्या रिसेप्शन काऊंटरकडे जातो. त्याचवेळी सोनम बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. ती रेनकोट काढते आणि केस नीट करते. 

वाचा >>"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी

थोड्या वेळाने राजा बाहेर येतो. त्यानंतर दोघेही काही गोष्टी सुटकेसमधून बाहेर काढतात. त्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये ठेवतात आणि सामानाची बॅग हॉटेलमध्ये नेऊन ठेवतात. त्यानंतर दोघेही स्कूटर घेऊन फिरायला निघून जात असल्याचे दिसत आहे. 

हा सीसीटीव्ही व्हिडीओ २२ मे रोजीचा आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघेही बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. होमस्टेपासून २० किमी अंतरावर असलेल्या एका खोल दरीत राजाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह इंदौरला आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मागील १५ दिवसांपासून सोनमचा शोध सुरूच आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशcctvसीसीटीव्ही