शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:45 IST

Raj Mohammad arrested :आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती.

लखनौ : राजधानी लखनऊमधील अलीगंज येथील आरएसएसचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राज मोहम्मदला लखनौच्या मादियानव पोलिसांच्या संयुक्त कारवाईने तामिळनाडूतून अटक करण्यात आली. आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या देखरेख पथकाने आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला अटक केली.

आरएसएसशी संबंधित नीलकंठ तिवारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना  व्हॉट्सॲपवर संघाची कार्यालये उडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यात लखनौ, गोंडा येथील नवाबगंज आणि कर्नाटकातील चार ठिकाणी संघाच्या कार्यालयांचा उल्लेख आहे.तिवारीच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये धमक्या देण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री आठ वाजता स्फोट होण्याची भीती होती. त्यावर लिहिले होते, 'सरस्वती विद्या मंदिर, सेक्टर क्यू, सेक्टर-ए, सेक्टर के, अलीगंज, लखनौ. V49R+J8G, नवाबगंज, उत्तर प्रदेश 271304: तुमचे सहा पक्ष कार्यालय बॉम्बने उडवले जाईल. 8 वाजता. शक्य असल्यास, स्फोट थांबवा.आरोपींची चौकशी सुरू आहेहे प्रकरण गांभीर्याने घेत उत्तर प्रदेश पोलिसांनीही एटीएससह तपासास सुरुवात केली. सायबर सेलच्या मदतीने उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने तामिळनाडूतील पुड्डुकोट्टई येथील आरोपींचे लोकेशन ट्रेस केले. यानंतर तामिळनाडू पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसचे पथक विमानाने तामिळनाडूला पोहोचले जेथे आरोपीची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेशTamilnaduतामिळनाडू