शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 22:19 IST

Aryan Khan : खोचक प्रतिक्रिया देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना व्हिडीओ डिलीट करू नका आणि काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण असा सवाल विचारला आहे. 

ठळक मुद्देएनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच होती, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आर्यन खानसह, किरण गोसावी आणि काळ्या कपड्यातील व्यक्तीचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसत आहे. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती काळ्या कपड्यात दिसतोय, जो खुर्चीवर अगदी आरामात बसला आहे. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसते आहे. हा व्हिडीओ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यावर खोचक प्रतिक्रिया देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना व्हिडीओ डिलीट करू नका आणि काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण असा सवाल विचारला आहे. 

कुणाल जानी ही तीच व्यक्ती जी सुशांत सिंह प्रकरणात जेलमध्ये गेली होती. तसेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची बिझनेस पार्टनर आहे. हा व्यक्ती एनसीबी कार्यालयात काय करत होता? कुणाल जानी नेमका कोण आहे?, कुणाल जानीचं तिथे असणं याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 

एनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच होती, अशी चर्चा सुरु झाली आहे. कुणाल जानीचं वांद्र्यात एक हॉटेल आहे. तो अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आहे. एनसीबीनं त्याला अटकही केली होती, सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्तीला ड्रग्स पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. दोनच आठवड्यांपूर्वी त्याला विशेष NDPS कोर्टानं जामिन मंजूर केला होता. सुशांत-रिया प्रकरणात कुणाल जानीचे व्हॉट्सअप चॅट एनसीबीला मिळाले होते. यात तो कोकेनचा उल्लेख करताना मिळाला, असा एनसीबीनं आरोप लावला होता. इतकंच नाही तर कुणाल जानी ड्रग पेटलर्स आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत होता, असाही आरोप करण्यात आला होता. 

कोण आहे कुणाल जानी ?

कुणाल जानीला एनसीबीनं अटक केली होती, रिया चक्रवर्तीच्या भावासह त्याला अटक झाली होती. आता फक्त सुशांत सिंहचा मित्र इतकीच जानीची ओळख नाही. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याच्याशीही जानीचा जवळचा संबंध आहे. कुंद्रा सध्या पॉर्न प्रकरणात जामिनावर आहे. राज कुंद्रा आणि कुणाल जानी हे दोघे बिझनेस पार्टनर्स आहेत. राज कुंद्रा आणि कुणाल जानी हे दोघेही वांद्र्याच्या बॅस्टिअन रेस्टॉरंटचे डायरेक्टर आहेत. 

आता हाच कुणाल जानी आर्यन खानला अटक केली तेव्हा एनसीबीच्या ऑफिसमध्ये होता या चर्चेला उधाण आलंय. त्यातच भाजपचे नेते मोहीत भारतीय यांनीदेखील या व्यक्तीचा फोटो ट्विट केलाय. इतकच नाही तर कुणाल जानीचा खुद्द शाहरुखसोबतचाही फोटो ट्विट केलाय. नवाब मलिकांच्या सत्यमेव जयते या ट्विटला त्यांनी रिट्विट केलंय आणि हे दोन फोटो शेअर केलेत.

आता कुणाल जानी एनसीबी ऑफिसमध्ये होता हे जर खरं असेल तर यामागे खूप मोठा अर्थ आहे. कुणाल जानी याच्यावर ड्रग पेडलर्सशी संबंध असल्याचे आरोप आहेत. त्यासाठी तो जेलमध्येही गेला होता. आता कुणाल जानी एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खानला अटक केली तेव्हा होता म्हणजे आर्यन प्रकरणाची टीप एनसीबीला कुणाल जानीनंच दिली होती का असा संशय येत आहे. कुणाल जानीनं एनसीबीसोबत हातमिळवणी करत ड्रग्स पेडलर्सचा पर्दाफाश करायचं ठरवलंय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही कुणाल जानीसारखी दिसत असली तरी ती व्यक्ती कुणाल जानीच आहे. याबाबत पुष्टी लोकमत करत नाही. 

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSanjay Rautसंजय राऊतTwitterट्विटरRaj Kundraराज कुंद्राDrugsअमली पदार्थ