Raj Kundra : राज कुंद्राच्या जामीन अर्जावर २० ऑगस्टला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:45 IST2021-08-10T22:19:20+5:302021-08-10T22:45:33+5:30
Raj Kundra : या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

Raj Kundra : राज कुंद्राच्या जामीन अर्जावर २० ऑगस्टला होणार सुनावणी
शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणी आता वाढत आहेत. होय, न्यायालयाने आज राज कुंद्राच्या जामीन अर्जावर सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे, याचा अर्थ राज कुंद्रालाही येत्या काही दिवसात तुरुंगात राहावे लागेल. १४ जुलै रोजी राज कुंद्राला न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ज्याची सुनावणी आता २० ऑगस्ट रोजी होणार आहे.
राज कुंद्रा कारागृहात गेल्यानंतर शिल्पा शेट्टीला अनेक अडचणींना तोंड देत आहे. तिच्या पतीला जामीन मिळावा यासाठी ती सतत प्रयत्न करत आहे. न्यायालय या सुनावणीची तारीख सातत्याने पुढे ढकलत आहे. जिथे आधी ही सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार होती, त्यानंतर ती १० ऑगस्ट करण्यात आली आणि आता ती थेट २० ऑगस्टला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शेट्टी आणि कुंद्रा कुटुंबासाठी ही मोठी संकटाची वेळ आहे. जिथे पोलिसांनी राज कुंद्राच्या प्रकरणात अनेक लोकांची सतत चौकशी केली आहे.