शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर शहरातील तिघा सावकारांच्या घरावर छापा; लातुरमध्ये कारवाईने खळबळ

By राजकुमार जोंधळे | Updated: February 27, 2026 22:44 IST

कोरे धनादेश अन् बाँड्स केले जप्त

राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर): शहरासह परिसरात अवैध सावकारीने धुमाकूळ घातला असून, गरिबांसह छोटे व्यावसायिक सावकारीच्या पाशात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर, सहकार विभागाने मोठी कारवाई करत उदगीर शहरातील तिघा संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार आणि उदगीरचे सहाय्यक उपनिबंधक बी.एस. नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान, या पथकांनी शुक्रवारी सकाळी उदगीर शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबवली. रवीप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड यांच्या घराची झडती घेतली असता अवैध सावकारीशी संबंधित अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती लागली आहेत. काशिनाथ विश्वनाथ सोमवंशी, निडेबन यांच्याकडेही अवैध व्यवहारांची कागदपत्रे सापडली आहेत. तर येनकी-मानकी राेडवरील पिराजी बाबुराव बालूरे यांच्या घरीही पथकाने कसून तपासणी केली. या कारवाईत अहमदपूर, जळकोट, औसा, निलंगा आणि लातूर येथील सहकार अधिकारी तसेच शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.

पथकाचा छापा; काय केले जप्त?

सहकार विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, सह्या केलेले कोरे स्टॅम्प पेपर आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे जप्त करून त्यांचा रितसर पंचनामा करण्यात आला.

पाच ते दहा टक्के व्याजाचे आहे चक्र

उदगीर शहरात ५ ते १० टक्के व्याजाच्या चक्रात अडकलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे समोर आले. अनेकदा व्याजाच्या मोबदल्यात गुंडांकरवी धमकावत कर्जदारांचे सोने अथवा स्थावर मालमत्ता बळकावली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

नागरिकांनी तक्रार करावी

कोणत्याही नागरिकाचे अवैध सावकारीतून शोषण होत असेल, जबरदस्तीने वसुली केली जात असेल किंवा मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली जात असेल, तर त्यांनी न घाबरता सहकार विभागाकडे तक्रार करावी.- बी. एस. नांदापूरकर, सहाय्यक

English
हिंदी सारांश
Web Title : Raids on Usurers' Homes in Udgir; Latur Shaken

Web Summary : Authorities raided three usurers in Udgir after a suicide due to harassment. Documents, blank checks, and signed papers were seized. Victims are urged to report exploitation.
टॅग्स :laturलातूरraidधाडCrime Newsगुन्हेगारी