जॅमर काढ, अन्यथा तुझी नोकरीच घालवतो..हिंजवडीत वाहतुक पोलिसाशी अरेरावी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:52 PM2018-12-12T17:52:06+5:302018-12-12T17:53:43+5:30

तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो. असे धमकावणाऱ्या दोन जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

quarrel with trafic police by two person in hinjawadi | जॅमर काढ, अन्यथा तुझी नोकरीच घालवतो..हिंजवडीत वाहतुक पोलिसाशी अरेरावी  

जॅमर काढ, अन्यथा तुझी नोकरीच घालवतो..हिंजवडीत वाहतुक पोलिसाशी अरेरावी  

Next
ठळक मुद्दे अरेरावी करणाऱ्या या मोटारचालकाला कायदेशीर कारवाईमुळे तुरूंगाची हवा खाण्याची वेळ

पिंपरी : मोटारीला जॅमर लावलायं, पावती करणार नायं, काय होईल? फाशी होईल का कसले चलन? पहिल्यांदा तू जॅमर काढ, असा एकेरी उल्लेख करून वाहतुक पोलीसाशी अशी उद्धटपणे वाहनचालकाने वर्तणुक केली. एवढ्यावरच न थांबता, तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो. असे धमकावणाऱ्या दोन जणांवर हिंजवडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी वाहतुक विभागात कार्यरत असलेल्या अमोल जनार्दन बनसोडे (वय ३२)या पोलीस कर्मचाऱ्याने दोघांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत पांडुरंग मालपोटे (वय ४५,रा.कातरखडक, मुळशी) आणि किरण छबन मालपोटे (वय ३०) या दोन आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. गणपत मालपोटे या आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. शिवाजी चौक, हिंजवडी येथे पीएमपी बसथांब्याजवळ नो पार्कींग असा फलक लावलेला असताना, त्या ठिकाणी मोटारी उभ्या केलेल्या दिसुन आल्या. त्या मोटारींना वाहतुक पोलिसांनी जॅमर लावले. एमएच १४,ई एम ७०८० या क्रमांकाची मोटार तेथे उभी होती. त्या मोटारीलासुद्धा जॅमर लावले होते. मात्र या मोटारीचे जॅमर काढ, असे एकेरी भाषेत आरोपी वाहतूक पोलिसांना सांगत होते. पहिल्यांदा दंडाची पावती फाडा, नंतर जॅमर काढतो, असे सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी आरोपींनी हुज्जत घातली. जॅमर तुला काढावेच लागेल, असे शिवराळ भाषेत ते सांगू लागले. एवढेच नव्हे तर फियार्दी पोलिसाच्या अंगावर धावुन जाण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
हिंजवडी, वाकड परिसरात अशा प्रकारे वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दोन दिवसांपुर्वी पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणारा, पोलीस कर्मचाऱ्याला तुला पगार किती? असे विचारतो आहे, अलिशान मोटार असल्याने शासकीय सेवेत असलेला वाहतुक नियमन करणारा पोलीस त्याला नगन्य वाटत असल्याचे सोशल मिडीयावर अनेकांनी पाहिले. अरेरावी करणाऱ्या या मोटारचालकाला कायदेशीर कारवाईमुळे तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आली. ही घटना ताजी असताना, पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या मानसिकतेबद्दल आश्चर्य व्यकत होत आहे.

Web Title: quarrel with trafic police by two person in hinjawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.