भरुच (गुजरात) - गुजरातपोलिसांनी खळबळजनक खून प्रकरणाचा खुलासा केला आहे. महिनाभरापूर्वी गुजरातच्या अंकलेश्वर येथील एका खासगी रुग्णालयात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपीने त्याच्या पत्नीला तिच्या सलाईनच्या बाटलीत सायनाईड द्रव्य टाकून मारले. पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली. अंकलेश्वर शहर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वैवाहिक कलहामुळे आरोपीने हा गुन्हा केला.पोलिसांनी सांगितले की, उर्मिला वसावा (३४) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतर खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आले. फॉरेन्सिक अहवालातून सिद्ध झाले की, वसावा यांचा मृत्यू सायनाइडमुळे झाला. अंकलेश्वर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या जिग्नेश पटेल याने पत्नी वसावाला इंजेक्शनमधून विष दिले.
सलाईनच्या बाटलीत सायनाईड टाकलं! पतीनं पत्नीला जीवे मारलं; महिन्याभरानं पोलिसांना कळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 22:18 IST
Husband kills wife :अंकलेश्वर शहर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वैवाहिक कलहामुळे आरोपीने हा गुन्हा केला.
सलाईनच्या बाटलीत सायनाईड टाकलं! पतीनं पत्नीला जीवे मारलं; महिन्याभरानं पोलिसांना कळलं
ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, उर्मिला वसावा (३४) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.