शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गायिका जस्मिन सँडलसला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 16:20 IST

जस्मिन सँडलस राहत असलेल्या हॉटेलमध्ये सुरक्षा पुरवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : एका कार्यक्रमासाठी दिल्लीत पोहोचल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप अमेरिकेत राहणारी प्रसिद्ध पंजाबी गायिका जस्मिन सँडलसने (jasmine Sandlas) केला आहे. दरम्यान, कॉल करणाऱ्या व्यक्तीने गायिकेला धमकी देताना तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख केला होता. तसेच, जस्मिन सँडलसला जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्म करायला सांगितले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या फोनवरून जस्मिन सँडलसला धमकी देण्यात आली, तो एक आंतरराष्ट्रीय नंबर होता. जस्मिन सँडलसच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ उत्तर-पश्चिम दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. याचबरोबर, जस्मिन सँडलस राहत असलेल्या हॉटेलमध्ये सुरक्षा पुरवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

यापूर्वी दिल्ली पोलीस आणि इतर एजन्सींच्या तपासात असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्वोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसह अनेक बड्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, लॉरेन्स गँगचा सलमान खानला मारण्याचा प्लॅन तीनदा अपयशी ठरला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अहमदाबाद तुरुंगात आहे, त्याची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई आरोपी आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयए आरोपी लॉरेन्स बिश्वोईची चौकशी करत आहेत.

दरम्यान, पंजाब इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका जस्मिन सँडलस हिच्या परिचयाची गरज नाही. आपल्या दमदार परफॉर्मेंसने सर्वांची मने जिंकणारी जस्मिन सँडलस केवळ पंजाबमध्येच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये स्टेज शो करते. जस्मिन सँडलसचे चाहते तिचा जादुई आवाज लाईव्ह ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी