शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या संतोष मानेच्या तावडीतून थोडक्यात वाचले पुणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:20 IST

काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़.

पुणे : स्थळ शिवाजीनगर एसटी बसस्थानक, वेळ रात्रीचे पावणेदहा वाजलेले, पुणे उस्मानाबाद शिवशाही बस प्रवाशांनी भरलेली व निघण्याच्या तयारीत होती़. अचानक एक जण बसचालकाच्या जागेवर बसला़. त्याने बस सुरु केली व वेगाने बसस्थानकाच्या बाहेर आणली़. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना काही तरी वेगळे घडत असल्याचे लक्षात आले़ पाहिले तर बस कंडक्टर खालीच होता़. चालकही गणवेशामध्ये नव्हता़. तेव्हा प्रवाशांनी एकच आरडाओरडा सुरु केला़. एकाने पुढे होऊन पाहिले तर चालक दारुच्या नशेत दिसत होता़. त्याने तातडीने बसचे स्टेअरिंग धरुन त्याला बस थांबविण्यास सांगितले़. त्यामुळे तो बस सोडून पळू लागला़. चौकात असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले़ चौकशी करता त्याची साप्ताहिक सुट्टी असतानाही त्याने दारुच्या नशेत बस चालविली होती़. त्याला वेळीच रोखल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला़. अनेकांना तर संतोष माने याची आठवण झाली़. दुसरा संतोष माने होता होता वाचला़. हा थरार शिवाजीनगर बस डेपो ते शिमला ऑफिस चौक दरम्यान मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता झाला़. अमोल विठ्ठल चोले (वय ३३, रा़ ताडीवाला रोड) असे या बसचालकाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. याप्रकरणी जिन्नसराव श्रीरंग ओव्हाळ (वय ५७, रा़. सैनिकनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. अमोल चोले हा शिवाजीनगर बस डेपोमध्ये बसचालक असून त्याची बुधवारी साप्ताहिक सुट्टी होती़ त्याला बीडला गावाला जायचे होते़. शिवशाही बस शिवाजीनगर बसस्थानकात उभी होती़. बस घेऊन जात असल्याचे सांगण्यासाठी चालक नियंत्रण कक्षाकडे गेला होता़. कंडक्टरही बसच्या बाहेर थांबले होते़. अशावेळी अमोल याने दारुच्या नशेत बसमध्ये येऊन बस चालू केली व तो ती घेऊन जात होता़. तो साध्या ड्रेसमध्ये असल्याने प्रवाशांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी बस सिमला ऑफिस चौकात थांबविण्यास भाग पाडले़. पोलिसांनी बस पळवून नेऊन नुकसान केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे़. .................काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एस टी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़. त्यात त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याने त्यात ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर, २७ जण जखमी झाले होते़.

 

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीCrime Newsगुन्हेगारीpassengerप्रवासी