शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकाची फुटेजशी छेडछाड; कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 10:50 IST

पाेर्शे अपघात, आमदार टिंगरेंमुळे अजित पवार गट आला अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाळाचे वडिल आणि आजोबांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले. या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता ते सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणून, अपहरण करून त्याला ताब्यात ठेवल्याबाबत अपघात करणाऱ्या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (७७) आणि वडील विशाल अग्रवाल यांना गुन्हे शाखेने अटक केली. सुरेंद्रकुमारची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. तर विशाल याला या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक करण्यात आली.

कार जप्त; फोन बाकी- आरोपींनी चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्या फोनबाबत मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सीबीआय चौकशी करा : नाना पटोले

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे, तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करून लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या, यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. दरम्यान, पुण्याच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, बिल्डर बापाच्या बाळाने पोर्शे गाडी भरधाव चालवत २ तरुण अभियंत्यांचे बळी घेतले. अपघातानंतर लगेच पोलिस ठाण्यात गेलेले आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे अजित पवार गट राजकीयदृष्ट्या अडचणीत आला आहे. विधानसभेच्या या जागेसाठी आग्रही असणाऱ्या भाजपचा दावा टिंगरे यांच्या उपस्थितीमुळे आता फिक्स झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विधानसभेच्या सन २०१९च्या निवडणुकीत टिंगरे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत भाजपचे तत्कालीन आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव करून निवडून आले. नंतरच्या फाटाफुटीत आमदार टिंगरे अजित पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामुळेच आता महायुती कायम राहिली, तर वडगाव शेरी विधानसभेची जागा कोणाला? असा प्रश्न उभा राहिला होता. टिंगरे यांच्या अपघातानंतरच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने तो निकालात निघाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एक ओळीचा खुलासा

  • अजित पवार यांच्यावरही टिंगरे यांच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने शिंतोडे उडाले. ते टिंगरे यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. इतका भीषण अपघात झाल्यानंतर पालकमंत्री असूनही ते तब्बल ८ दिवस पुण्यात आलेच नाहीत. 
  • टिंगरे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तिथे गेले, असा एका ओळीचा खुलासा त्यांनी मुंबईतून केला. पुण्यात आल्यावरही त्यांनी अपघातावर फारसे भाष्य केले नाही. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेवर संशयाचे धुके दाटले आहे.

भाजपचा हक्काचा मतदारसंघ- वडगाव शेरी हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी या आधी या मतदारसंघातून भाजपला लक्षणीय मताधिक्य मिळाले आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी या मतदारसंघाबाबत फार आग्रही आहेत. अजित पवार गटाबरोबरच्या युतीला स्थानिक स्तरावर मान्यता नाही. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात