शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात मोबाईल विकणारा निघाला चोर : सापडले २४ हँडसेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:29 IST

सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

पुणे :सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

   नागनाथ रामभाऊ सुतवणे असे या आरोपीचे नाव आहे. पोलिस हवालदार अशोक माने आणि प्रकाश लोखंडे यांना गुप्त बातमीदाराने स्वारगेट बसस्टॉपला एक व्यक्ती स्वस्तात मोबाईल विकत असल्याची खबर दिली. त्यांनी त्याठिकाणी अन्य पोलीस स्टाफसह जाऊन संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडे चोवीस मोबाईल हँडसेट सापडले. यामध्ये झोलो, स्पाईस, इंटेक्स, मॅक्रोमॅक्स, डिस्को, एलवायएफ, सॅमसंग, झिओक्स, नोकिया, कार्बन, लावा, ओप्पो, आय कॉल, ओपल कंपनीच्या एकूण १ लाख ९ हजार ५०० रुपये किंमतीच्या फोनचा समावेश आहे. 

    स्वारगेट बसस्टॅन्ड किंवा परिसरातून कोणाचे मोबाईल फोन चोरी गेले असल्यास स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस नितीन भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केली. 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलPoliceपोलिसCrimeगुन्हा