शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

निष्क्रिय बँक खात्याचा डाटा मिळवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:59 IST

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला.

पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्क्रिय) खात्यांचा डाटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी सायबर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८  जणांना अटक केली आहे. भाजपाच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहन रवींद्र मंकणी (३७, रा. सहकारनगर),  रवींद्र माशाळकर (३४, रा. लातूर),  मुकेश मोरे (३७, रा. येरवडा), राजशेखर ममीडा (३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (४५, रा. वाशीम, सध्या औरंगाबाद), आत्माराम कदम (३४, रा. मुलुंड, मुंबई), वरुण वर्मा (३७, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) आणि विकासचंद यादव (२५, रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (५४, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (४०, रा. वडगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाइट्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर आणखी पाच पुरुष व एक महिला आली. पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्लक असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाइल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिस