पबजी खेळता खेळता युवकाच्या प्रेमात पडली विवाहित महिला; भेटण्यासाठी वाराणसीला पोहचली तेव्हा...

By प्रविण मरगळे | Published: February 25, 2021 03:02 PM2021-02-25T15:02:09+5:302021-02-25T15:04:04+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांगडा येथील सीमाभागातून एक विवाहित महिला अचानक बेपत्ता झाली

PUBG Mobile Game News: Married Women Fell In Love With 12th Class Student And Reached Varanasi | पबजी खेळता खेळता युवकाच्या प्रेमात पडली विवाहित महिला; भेटण्यासाठी वाराणसीला पोहचली तेव्हा...

पबजी खेळता खेळता युवकाच्या प्रेमात पडली विवाहित महिला; भेटण्यासाठी वाराणसीला पोहचली तेव्हा...

Next
ठळक मुद्देया महिलेला नातेवाईकांनी खूप शोधलं परंतु ती कुठेच सापडली नाहीअखेर हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं, पोलिसांनीही तातडीचे याचा तपास करून महिलेचा शोध घेतलात्यानंतर विवाहित महिलेने स्वत: नातेवाईकांना फोन लावून तिला वाराणसीतून परत नेण्यासाठी मदत मागितली.

फेसबुक आणि सोशल मीडियावरून प्रेम जुळल्याचे अनेक किस्से तुम्हाला ऐकायला मिळाले असतील, परंतु पबजी खेळता खेळता एका विवाहित महिलेला युवकावर प्रेम जडलं आणि त्याला पाहाण्यासाठी कुटुंब सोडून ती वाराणसीत पोहचली, ही घटना हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील आहे. वाराणसीत पोहचलेल्या या महिलेला पोलिसांना ताब्यात घेऊन तिच्या नातेवाईकांकडे सोपवलं आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांगडा येथील सीमाभागातून एक विवाहित महिला अचानक बेपत्ता झाली, या महिलेला नातेवाईकांनी खूप शोधलं परंतु ती कुठेच सापडली नाही, अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं, पोलिसांनीही तातडीचे याचा तपास करून महिलेचा शोध घेतला. तपासात वाराणसी येथून या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. यानंतर महिलेने पोलिसांना जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहित महिलेला पबजी खेळण्याची सवय होती, याच वेळी खेळता खेळता तिची ओळख वाराणसीतील एका युवकासोबत झाली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, त्यानंतर युवकाच्या शोधात ही महिला वाराणसीत पोहचली तेव्हा हा युवक १२ चा विद्यार्थी असल्याचं तिला माहिती पडलं, त्यानंतर विवाहित महिलेने स्वत: नातेवाईकांना फोन लावून तिला वाराणसीतून परत नेण्यासाठी मदत मागितली.

यापूर्वीही अनेकदा पबजीवरून विविध प्रकरण समोर आली आहेत, २०२० फेब्रुवारी महिन्यात फोनवर पबजी गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी सोलन जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा महाराष्ट्रच्या औरंगाबादपर्यंत पोहचला होता, त्यानंतर पोलीस तपासात हे उघड झालं, इतकचं नाही तर जुले २०२० मध्ये एका मुलाला ऑनलाईन गेम खेळणं महागात पडलं, या मुलाने पबजी खेळण्याच्या नादात आई-वडिलांच्या खात्यावरील दीड लाख रूपये ट्रान्सफर केले. जेव्हा आईवडिलांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा हे प्रकरण उघड झालं. या मुलाने सांगितलं की, त्याला फोनवरून धमकी आली होती की, जर त्याने पैसे दिले नाहीत तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू असं फोन करणाऱ्या इसमाने मुलाला धमकावलं होतं.

Web Title: PUBG Mobile Game News: Married Women Fell In Love With 12th Class Student And Reached Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस