शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा कारागृहामध्ये कैद्याचे उपोषण; रक्षकाकडून मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 20:12 IST

कुटुंबियांचाही आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देअन्नत्याग केला असून त्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्याची बहिण विरेंदर कौर यांनी केला आहे. तीन दिवस त्याने अन्नत्याग केला असून आपल्याला व वकीलाला भेटू दिले जात नाही, असा आरोप तिची बहिण विरेंद्रर कौर यांनी केला.

मुंबईखूनाच्या आरोपाखाली नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जोरावर सिंह कौर याने तरुंग अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून जेलमध्ये उपोषण सुरु केले आहे. त्याने अन्नत्याग केला असून त्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्याची बहिण विरेंदर कौर यांनी केला आहे. भावाच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी तुरुंग प्रशासन जबाबदार असेल, त्यांच्या निषेधार्थ आपणही कारागृह महासंचालकांच्या कार्यालयसमोर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.जोरावर सिंह हा गेल्या दीड वर्षापासून तळोजा कारागृहात आहे. त्याला पंजाबमधील एका गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. तसेच खारघर येथे एका न्यायाधिशाच्या पत्नीचा सुपारी घेवून खून केल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी त्याला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यामध्ये तोंडावर जखमा पायाला फॅक्चर होवूनही जेल प्रशासनाने उपचाराकडे दुर्लक्ष केले होते. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर जेल व रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सहा तरुगांधिकाऱ्यांविरुद्ध जबर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना निलंबित करण्यात आलेले आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयात लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये अधिकाऱ्यांना फायद्याचे ठरण्यासाठी जोरावर सिंह याला पंजाब जेलमध्ये पाठविण्याची विनंती प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याला जोरावर व त्याच्या कुटुंबियांनी याने नकार दिल्याने जेलमध्ये मारहाण व छळ करण्यात येत आहे, त्यामुळे तीन दिवस त्याने अन्नत्याग केला असून आपल्याला व वकीलाला भेटू दिले जात नाही, असा आरोप तिची बहिण विरेंद्रर कौर यांनी केला.तळोजा जेलकडून उडवाउडवीची उत्तरेतळोजा कारागृहात दुरध्वनी करुन घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता सुरक्षारक्षाकडून टाळाटाळ करण्यात आली. जेल अधीक्षकांना फोन देण्यास सांगितले असता ते नाहीत, असा काही प्रकार घडलेला नाही, असे सांगत तेथील नियंत्रण कक्षातील रक्षकाने नाव न सांगता फोन कट केला.

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगagitationआंदोलनMumbaiमुंबईPoliceपोलिसMurderखून