शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निषेधाचे पोस्टर्स, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:19 IST

Mumbai News : मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांची पोस्टर्स लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबई : मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांची पोस्टर्स लावून निषेध व्यक्त करण्यात आला. ही पोस्टर्स पादचाऱ्यांचा पायाखाली येतील अशा पद्धतीनी लावली होती. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी पोस्टर्स हटविले असून, अधिक तपास सुरू केला आहे.फ्रान्समधल्या इतिहास शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण गाजत असताना गुरुवारी फ्रान्स शहरात चाकूहल्ला झाला. यामध्ये तिघांचा बळी गेला. दरम्यान, आपण अशा प्रकारच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, शिक्षकाची हत्या म्हणजे इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी म्हटले. त्यानंतर फ्रान्स सरकारने इस्लामी कट्टरपंथीयांविरुद्ध मोहीम सुरू करून छापे मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या या विधानानंतर मुस्लीमबहुल देशांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईतही याचे पडसाद पाहावयास मिळाले.गुरुवारी मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर त्यांची पोस्टर्स लावून निषेध करण्यात आला. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी सांगितले. 

ठाण्यातही करण्यात आली निदर्शने ठाणे -  मुंबईनंतर ठाण्यातील रस्त्यांवरही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर चिकटवून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातील राबोडी परिसरात मशिदीजवळ नगरसेवक नजीब मुल्ला आणि मुस्लिमबांधवांनी आंदोलन, निदर्शने करून या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लिम देशांतून आंदोलने होत आहेत. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. प्रत्येक मुस्लिम आणि हिंदूंच्या हृदयात या वक्तव्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. ज्यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला, त्यांच्याबद्दल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचे वक्तव्य केले आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितलेे.

टॅग्स :MumbaiमुंबईFranceफ्रान्स