शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीचे रॅकेट : आंतरराज्यीय स्तरावर मुलींची विक्री; बंगळूरच्या अल्पवयीन मुलीची आर्णीत सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 19:25 IST

Prostitution racket : दोन दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी दोन तरुणांसोबत दुचाकीवरून आली. ती त्या महिलेच्या घरी वास्तव्याला होती.

ठळक मुद्देआरोपी दत्ता हिरामन राठोड (३०), अर्जुन गणेश आडे (२०) रा. महादापूर ता. माहूर जि. नांदेड यांना अटक केली.

आर्णी (यवतमाळ) : शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी या उच्चभ्रूंच्या वस्तींमध्ये काही सजग नागरिकांना आक्षेपार्ह हालचाली आढळून आल्या. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दखल घेवून संबंधितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले. यातून धक्कादायक माहिती पुढे आली. आर्णी सारख्या लहानशा गावातून आंतरराज्यीय नेटवर्क सुरू असल्याचे उघड झाले. यामध्ये देहविक्रीसाठी अल्पवयीन मुलीची खरेदी करण्यात आली. सतर्कतेमुळे बंगळूरच्या मुलीची सुटका झाली. तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.ड्रीम लॅन्ड सीटी येथे एका संशयित महिलेकडून देहविक्रीचे रॅकेट चालविले जाते. ती आंतरराज्यीय स्तरावरच्या रॅकेटची सक्रीय सदस्य आहे. परिसरातील नागरिकांना त्या महिलेवर संशय होताच. दोन दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी दोन तरुणांसोबत दुचाकीवरून आली. ती त्या महिलेच्या घरी वास्तव्याला होती. त्या मुलीची विक्री केली जाणार त्यापूर्वीच ठाणेदार पितांबर जाधव पथकासह तेथे पोहोचले. ती महिला, अल्पवयीन मुलगी व दोन युवकांना ताब्यात घेतले.

बंगळूर सीटी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. संशयितांच्या कबुली जबाबातून देहविक्रीचे रॅकेट उघड होताच आर्णी पोलिसांनी बंगळूर सीटी पोलिसांशी संपर्क केला. मुलीचे आई-वडील व पोलीस जमादार संतोष दासर, पद्‌मावती बबले हे सोमावरी आर्णी पोहोचले. त्यांनी आरोपी दत्ता हिरामन राठोड (३०), अर्जुन गणेश आडे (२०) रा. महादापूर ता. माहूर जि. नांदेड यांना अटक केली. आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे देहविक्रीच्या व्यवसायात लोटली जाणारी अल्पवयीन मुलगी बचावली. ही कारवाई ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विजय चव्हाण, जया काळे, मिथून जाधव, महेश गावंडे यांनी केली.फेसबुकवरून ओढले प्रेमाच्या जाळ्यातविवाहित असलेला आरोपी दत्ता राठोड याने फेसबुकवरून बंगळूरच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला भावनिक करीत तु आली नाही तर आत्महत्या करतो, हाताची नस कापतो असे म्हणून नागपूर येथे येण्यास भाग पाडले. ती अल्पवयीन मुलगी गुरुवारी नागपूरला पोहोचली. तेथून दत्ताने साथीदार अर्जुन याच्या मदतीने दुचाकीवरून त्या मुलीला आर्णीत आणले. तिला ड्रीम लॅन्ड सीटी येथे राहणाऱ्या महिलेच्या घरी ठेवले. अशा प्रकारे अनेक मुलींची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्या महिलेच्या मोबाईलचे चॅटींग प्रतिष्ठितांशीआंबट शौकिनांची हौस पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलींना फसवणूक देहविक्रीत लोटले जात होते. संशयित महिलेचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये अनेक प्रतिष्ठितांची नावे पुढे आली. महिलेने प्रतिष्ठितांशी चॅटींग केल्याचे आढळून आले. यावरुन ती महिला मुली पुरविण्याचे रॅकेट चालवित असल्याचे सिद्ध होते. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने आर्णी पोलीस चौकशीशिवाय काहीही करू शकले नाही. बंगळूर पोलिसांनीसुद्धा त्या महिलेला गुन्ह्यात अटक करणार असल्याचे सांगून ही कारवाई पुढील टप्प्यात केली जाईल, असे स्पष्ट केले. आर्णी शहरासह तालुक्यात चॅटींगमध्ये असलेल्या प्रतिष्ठितांच्या नावाची चर्चा रंगत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYavatmalयवतमाळProstitutionवेश्याव्यवसाय