शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आधी पतीला सोडलं, मग दीराशी लग्न करून दोघांनाही संपवलं; संपत्तीसाठी 'तिने' रचला भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:42 IST

एका महिलेने आधी दोन भावांशी लग्न केलं आणि नंतर संपत्ती हडपण्यासाठी दोघांचीही हत्या घडवून आणली.

बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातून एक अशी खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्याने लग्न, नातेसंबंध आणि विश्वास यांना काळीमा फासला आहे. एका महिलेने आधी दोन भावांशी लग्न केलं आणि नंतर संपत्ती हडपण्यासाठी दोघांचीही हत्या घडवून आणली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता देवीचं लग्न २०११ मध्ये किशनगंज जिल्ह्यातील ठाकूरगंज येथील भूषण सिंग याच्याशी झालं होतं. मात्र लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच ती भूषण सिंगला सोडून निघून गेली. त्यानंतर तिने स्वतःच्या दीराशी म्हणजेच भूषणचा धाकटा भाऊ राजू सिंग याच्याशी कोर्ट मॅरेज केलं आणि त्याच्यासोबत राहू लागली.

नातेवाईकांचा आरोप आहे की, सुनीता देवीने तिचा दुसरा पती राजू सिंग याच्या हत्येचाही कट रचला होता. सुमारे एक वर्षापूर्वी राजू सिंगवर गोळीबार करण्यात आला होता, मात्र त्या हल्ल्यातून तो वाचला होता. काही काळानंतर जेव्हा ते बरे होऊन घरी परतले, तेव्हा गळा दाबून आणि तोंडावर उशी ठेवून त्यांची हत्या करण्यात आली. त्या वेळी कोणालाही संशय आला नाही आणि हे प्रकरण शांत झालं.

सोमवारी संध्याकाळी भूषण सिंग जनावरांसाठी शेतात चारा आणायला जात होता. त्याच वेळी आधीच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळी लागताच भूषण सिंग जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. नातेवाईक अशोक सिंग आणि इतरांनी आरोप केला आहे की, या हत्येमागे भूषणची पहिली पत्नी सुनीता देवीच आहे. जमीन आणि इतर संपत्ती हडपण्यासाठी तिने आधी राजू सिंग आणि आता भूषण सिंगची हत्या घडवून आणल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नातेवाईकांच्या मते, अलीकडच्या काळात सुनीता देवीने जमीन विकली होती, ज्यावरून भूषण सिंगशी तिचा वाद सुरू होता. भूषण बाहेर पडताच त्याच्यावर गोळीबार सुरू झाला. यावरून ही हत्या पूर्ण नियोजित कटाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं. घटनेची माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Kills Two Brothers, Husbands, for Property in Bihar

Web Summary : In Bihar, a woman married two brothers, then orchestrated their murders to seize their property. She first abandoned her first husband, married his younger brother, and allegedly killed them both. Police are investigating the shocking case.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू