'आता तेच राहिले नाही तर मी जगून काय करू', म्हणत पतीच्या मृत्यूच्या एका तासांनंतर पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:12 PM2022-05-04T12:12:50+5:302022-05-04T12:13:53+5:30

Madhya Pradesh : चेकअप दरम्यान समजलं की, ब्रेन हॅमरेजमुळे डॉक्टरची तब्येत बिघडली. लगेच त्यांची सर्जरी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

Professor Wife commits suicide one hour after her husband's death in Bhopal | 'आता तेच राहिले नाही तर मी जगून काय करू', म्हणत पतीच्या मृत्यूच्या एका तासांनंतर पत्नीची आत्महत्या

'आता तेच राहिले नाही तर मी जगून काय करू', म्हणत पतीच्या मृत्यूच्या एका तासांनंतर पत्नीची आत्महत्या

googlenewsNext

मध्य प्रदेशातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर असिस्टंट प्रोफेसर असलेल्या पत्नीने आत्महत्या केली. चूना भट्टी भागात राहणारे ४७ वर्षीय डॉक्टर पराग पाठक भाभा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. २८ एप्रिलला सकाळी ९ वाजता डॉक्टर पाठकची तब्येत अचानक बिघडली. पत्नी प्रीति झारिया यांनी पतीला पाणी पाजलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. चेकअप दरम्यान समजलं की, ब्रेन हॅमरेजमुळे डॉक्टरची तब्येत बिघडली. लगेच त्यांची सर्जरी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

२ मे च्या रात्री डॉक्टर पराग यांचं निधन झालं. पतीच्या निधनाची बातमी मिळताच पत्नी प्रीति झारिया यांना मोठा धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांना प्रीति म्हणाल्या की, आता त्यांच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आता या जगात माझं कुणीही राहिलेलं नाही आणि ती आता आत्महत्या करायला जात आहे. हे बोलून त्या आपल्या कारने हॉस्पिटलमधून निघून गेल्या.

हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रीति यांच्या भावांना डॉक्टरांना सगळी घटना सांगितली आणि तेही बहिणीच्या मागे गेले. पण तोपर्यंत प्रीति यांनी भदभदा वॉटरफॉलवरून उडी मारली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्या आला. पोस्टमार्टमनंतर मतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला. ज्यानंतर पत्नी-पतीची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली.

जबलपूरच्या राहणाऱ्या प्रीति भोपाळच्या नरेला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होत्या. चार वर्षाआधी त्यांचं लग्न झालं होतं. पण त्यांना मुल नव्हतं. मृत डॉक्टर परागचे स्वर्गीय वडील एसडीओ होते. तेच त्यांची आई डॉक्टर आहे. त्या मुलगा आणि सूनेसोबत राहत होत्या. मुलाची तब्येत बिघडल्यावर त्या सूनेसोबत हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. यादरम्यान सून कार घेऊन गेली आणि तिने आत्महत्या केली.
 

Web Title: Professor Wife commits suicide one hour after her husband's death in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.