शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फी न भरल्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:05 IST

Teacher killed student in Shravasti: उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Teacher killed student in Shravasti:उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या 250 रुपयांच्या फीसाठी एका शिक्षकाने तिसरीत शिकाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे मुलाच्या कुटुंबीयांमध्ये व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

8 ऑगस्ट रोजी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला फी न दिल्याच्या कारणावरून शिक्षकाने 13 वर्षीय ब्रिजेशला बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीनंतर मुलाला उपचारासाठी बहराइच येथे नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान काल सायंकाळी उशिरा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांसह स्थानिकांनी भिंगा सिरसिया रस्ता रोखून आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर प्रकरण कसेबसे शांत झाले. मृत विद्यार्थ्याच्या काकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भावाने सांगितली घटनामृताच्या भावाने सांगितले की, वर्गात येताच शिक्षकाने ब्रिजेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, माझ्या भैय्याने फी जमा केल्याचे मी सांगत राहिलो. पण मुख्याध्यापकांशी न बोलता आणि सत्य जाणून न घेता शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. भाऊ घरी पोहोचला, तेव्हा त्याची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले, पण त्याचा अखेर मृत्यू झाला. 

सीएम योगींना आवाहनशिक्षकाची क्रूरता आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना यूपीच्या श्रावस्ती जिल्ह्यातील सिरसिया पोलीस स्टेशन परिसरातील एका खाजगी शाळेतील आहे. पंडित ब्रह्मदत्त उच्च माध्यमिक विद्यालय असे शाळेचे नाव आहे. आता नातेवाईकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू