शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

केस कापल्यावरून कैद्याचा कारागृह अधिकाऱ्यावर हल्ला, तणावाची स्थिती झाली निर्माण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:48 IST

Crime News : सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते.

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

यवतमाळ : येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला. यानंतर कारागृहात अनागोंदी निर्माण झाली. सर्वच कैदी जोरजोराने ओरडून गोंधळ घालू लागले. कारागृहातील सुरक्षेचे सायरन वाजल्याने तात्काळ पोलीस पथक कारागृह परिसरात दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल ऊर्फ शिणू शिंदे रा.जामनकर नगर याला शेख यांनी केस असे का कापले म्हणून विचारणा केली. त्यावरून भडकलेल्या राहुलने थेट शेख यांच्यावर हल्ला चढविला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचारी मदतीला धावून आले. मात्र त्यानंतर कारागृहातील इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोरजोराने आरडाओरडा सुरू झाला. मदतीसाठी सायरन वाजवण्यात आले. हा आवाज ऐकून कारागृह कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह परिसरात दाखल झाले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुल ऊर्फ शिणू शिंदे याने १४ डिसेंबर २०१९ रोजी विनेश राठोड या युवकाचा वाघापूर टेकडी परिसरात खून केला होता. त्या आरोपातच तो कारागृहात आहे. कारागृहातील अशा कुख्यात आरोपींना येरवाडा व नागपूर कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने अशा बंद्यांची यादीच तयार केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसjailतुरुंगYavatmalयवतमाळPrisonतुरुंग