शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:42 IST

अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनीच्या पालकांना व पोलिसांना कळविण्यात आले.

ठळक मुद्देकॉलेजबाहेरील तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्याचे निलंबन केले.

मुंबई - महाविद्यालयात असतानाच तरुणीशी अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालत प्राचार्यानीच पीडितेला तब्बल ३ तास वर्गखोलीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कामोठे येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात घडला. पीडित विद्यार्थिनीची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी संतप्त विद्यार्थ्यांच्या जमावाने महाविद्यालयात आंदोलन करून महाविद्यालयीन प्रशासनाला प्राचार्याची पदावरून हाकलपट्टी करण्याची मागणी केली. विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्याचे निलंबन केले.कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी एक विद्यार्थिनी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेजबाहेरील तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने तातडीने हा प्रकार महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष नारायण खेडेकर यांना सांगितला. परंतु प्राचार्यानी तरुणावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्यासाठी व पीडित मुलीने गुन्हा दाखल करू नये यासाठी तिला एका वर्गामध्ये डांबून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोषी तरुणावर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थिनीला डांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गोंधळ घातला. अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनीच्या पालकांना व पोलिसांना कळविण्यात आले. मात्र त्यानंतरही तरुणावर कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी हा प्रकार कळताच गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्या प्राचार्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

 

यापुढेही महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक यंत्रणा रुजू ठेवण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनीही पोलीस गस्त सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. - अ‍ॅड़ वैभव थोरात, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसcollegeमहाविद्यालयsuspensionनिलंबन