मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:21 PM2022-07-16T17:21:11+5:302022-07-16T17:21:43+5:30

Fraud Case : अभिजीत परमेश्वर गाढवे असं आरोपीचे नाव आहे.

Pretending to be IPS on matrimonial sites; duped women | मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या 

मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या 

Next

मुंबई : साकीनाका पोलिसांनी एका व्यक्तीला एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आणि मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी म्हणून बतावणी केल्याप्रकरणी अटक केली आहे. अभिजीत परमेश्वर गाढवे असं आरोपीचे नाव आहे. अभिजित गाढवे या आरोपीने आयपीएस अधिकारी म्हणून बनावणी करून मॅट्रिमोनिअल साईटवर प्रोफाईल बनवले आणि त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी असल्याचा दावा केला.


आरोपीने फसवणूक केलेल्या महिलेच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी बुधवारी घाटकोपर येथील एका इमारतीतून आरोपीला अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने स्वत:ची ओळख IPS अधिकारी म्हणून दिली होती आणि तिला मुंबई विमानतळावर एका कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीसाठी ओळखपत्र आणि जॉईनिंग लेटर देण्यासाठी आरोपीने 70 हजार रुपये घेतले. मात्र, तिने कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा ओळखपत्र आणि पत्र बनावट असल्याचे तिला आढळले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pretending to be IPS on matrimonial sites; duped women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.